हातावर पोट असणार्या छोटे व्यापार्यांच्या उपजेविकेवर पडणार कुर्हाड
सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकार्यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश
केज (रिपोर्टर) मुख्य रत्यावरील व शासकीय कार्यालयाच्या अवती भवती काही दुकानदारांनी छोटे दुकाने टाकून आपल्या कुटूंबाची उपजेविका भागवितात मात्र काही माथे फिरु लोकांच्या चुकी मुळे पुन्हा या गरीबाच्या व्यवसायवर प्रशासनाचा हतोडा पडणार आहे.
गेल्या तिन महीण्या पुर्वि शासनाने केज शहरातील विविध भागातील लोकांनी रोड लगत अतिक्रमण केलेले ते तोडून काडले होते या मोहीमेत तालुक्यातील एक हजार कुटूंब रत्यावर आले होते मात्र प्रशासनाने धनदांडग्या लोकांच्या अतिक्रमण कडे दुर्लक्ष करुण गरीब लहाण व्यापारी यांच्यावर अन्याय केला असल्याची चर्रेने परिसर गाजले होते.मात्र पुन्हा शासनाने रत्यावर आलेल्या तसेच शासकीय जागेत अतिक्रमण बसलेल्या लोकांनवर कारवाईचा सपाटा उचल्ला असल्यामुळे ज्या लोकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलं त्यानी स्वतःच्या हताने रविवार पर्यत केलेले अतिक्रमण काडून घ्यावा अन्याथा सोमवारी कायदेशीर कारवाई होणार हे निचित..
पर्यायी जागा उपलब्ध करुण द्यावी
अतिक्रमण काडायला लहान व्यापारी व टपरीधारक यांचा कधीच विरोध केला नाही शासनाने अतिक्रमण शंभर टक्के तोडाव मात्र या लहान व्यापारी व टपरीधारक संघाच्या व्यापारी यांना व्यवसायसाठी पर्याय जागा उपलब्ध करुन द्यावी जेने करुण एक हजार कुटूंबाचा उपजेविकाचा प्रश्न मार्गि लागेल अशी मागणी लहाण व्यापारी व टपरीधारक संघाच्या वतीने करण्यात आली.