Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख-जातीची शिंदळ । तिला कोण कैसा वळी॥ वैचारिक ‘कंगाल’ कंगणा राणावत

अग्रलेख-जातीची शिंदळ । तिला कोण कैसा वळी॥ वैचारिक ‘कंगाल’ कंगणा राणावत


गणेश सावंत
मो. नं. 9422742810

नैतिक मुल्यांशी काहीही घेणे-देणे नसणार्‍या मनोवृत्ती जेंव्हा वड्यावगळीच्या पैदाशीतून जन्माला येतात तेंव्हा भारताला स्वातंत्र्य केंव्हा मिळाले? पारतंत्र्याच्या साखळदंडात जखडलेली भारत माता केंव्हा मुक्त झाली? जे स्वातंत्र्य रक्तपाताने, बलिदानाने मिळाले ते भीक होते? असे वैचारिक अनैतिकतेच्या संबंधातून जन्मलेले प्रश्‍न जातीची शिंदळ असणार्‍या व्यक्तींना पडतात. कारण त्यांना राष्ट्रभक्तीपेक्षा, राष्ट्रप्रेमापेक्षा, चाटूगिरी आणि भामटेगिरी करण्यात अधिक धन्यता वाटत असते. 2014 पासून असे वैचारिक अनैतिकतेच्या संबंधातून जन्मलेले जातीचे शिंदळ देशाच्या कानाकोपर्‍यात आपले विखारी फुस्कार सातत्याने सोडतात. असाच फुस्कार नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेली कंगना रानावत या चित्रपट अभिनेत्रीने सोडला. भारताला स्वातंत्र्य 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात मिळाल्याचे सांगत इ.स.1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते असे वक्तव्य या नैतिक मुल्यांशी देणे-घेण नसणार्‍या मनोवृत्तीतील बाईने केलं. हे वक्तव्य अत्यंत संतापजनक. जेंव्हा ही बाई एका जाहिर कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना हे वक्तव्य करत होती तेंव्हाच तिच मुस्काट वृत्तनिवेदीका असणार्‍या पत्रकाराने फोडलं असतं अथवा उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी फोडलं असतं तर नक्कीच तिला स्वातंत्र्याचं महत्त्व कळलं असतं. भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातील मोदी सरकार अशा पिलावळांना भारताचे सर्वोच्च पुरस्कार देवून जेंव्हा सन्मानित करतात तेंव्हा एक प्रकारे केंद्र सरकार अथवा भाजपाची विचारसरणी ही कंगनासारखीच ‘कंगाल‘ दिसून आल्याशिवाय राहत नाही. 200 वर्षे इंग्रजांच्या जाच,जुलमातून मुक्त होण्यासाठी कित्येक भारतीयांना शहादत पत्कारावी लागली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुँगा अशी ललकारी द्यावी लागली. लाल किल्लेंसे आयी आवाज, धिल्लन, सहेवाल, सहेनवाज-सहेनवाज या आत्म्यांच्या ललकारी आजही ऐकायला येतात. गांधींचा सत्याग्रह, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांची फाशी जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा क्रांतीच्या मशाली आजही अंत:करणात पेटून उठतात. अशा जाज्वल्य पेटता इतिहास साक्षीला असतांना कंगना राणावतसारखी


जातीची शिंदळ
जेंव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला भीक म्हणून संबोधते तेंव्हा अशा नैतिकमुल्य नसणार्‍या मनोवृत्तीचा समाचार घेतांना जगद्गुरू संत तुकोबा म्हणता जातीची शिंदळ तिला कोण कैसा वळी, आपघर ना बापघर चिंती मनी व्याभिचार, सेजे असोनिया धनी, पदद्वार मना आणी, तुका म्हणे अस्सल जाती जातीसाठी खाती माती । तुकोबा म्हणतात, ज्यांचा वैचारिक व्याभिचार हाच कुळ धर्म आहे अशा शिंदळपणाला कोणीही सतमार्गावर आणु शकणार नाही. ज्याच्या मनात व्याभिचाराचा विचार सुरू आहे असा व्यक्ती बाहेर जावून कितीदा नरकडी करेल हे सांगता येत नाही. मग ती व्यक्ती नवर्‍याची घरी असो अथवा बापाच्या घरी असो तिचं छत्र हे वैचारिक व्याभिचाराचच होय. आम्ही ही मोठ्या जबाबदारीने कंगना राणावत यांचं हे वक्तव्य त्यांच्या छत्रासारखच व्याभिचारी आहे हे ठामपणे म्हणतो. अरे ज्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी अखंड हिंदुस्तानातल्या 33 कोटी जनतेने तेंव्हा आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले, जनगणमन हे राष्ट्रगीत सुरू असतांना इंग्रजांनी गोळ्या घातल्या तरी मागे सरले नाही, कित्येक महिला विधवा झाल्या. इंग्रजांच्या अत्याचारापुढं कित्येक महिलांनी विहिरीत उड्या घेतल्या. परंतू स्वातंत्र्य लढ्यातून मागे हटल्या नाहीत. त्या भारताचे स्वातंत्र्य हे 2014 च्या ‘फेकुविच्छादन’ापेक्षा कित्येक हजारोपटीने सरस नव्हे तर सलाम करणारे आहे याची जाणीव फुकटात चमचेगिरी करून अथवा मखमली शय्यैवरची चादर बदलणार्‍यांना नक्कीच नसणार हे आम्हालाही माहिते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करावे लागते? सत्य काय असते? स्वाभिमान काय असतो? देशभक्ती कशाला म्हणतात? राष्ट्रभक्तीची व्याख्या काय? हे समजायला तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गाबाळाचे काय काम तेच आज राष्ट्रभक्तीची व्याख्या सांगुन अखंड हुतात्म्यांचा आणि शहिदांचा अपमान करत असतील तर पायातलं पायताण देशवासियांना अशा लोकांविरोधात अशा लोकांना मदत करणार्‍या व्यवस्थेविरोधात हातात घ्यावच लागेल. कंगना राणावत ही अभिनेत्री सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्याबाबत जेंव्हा ही बाई बोलते तेंव्हा तिचे


तोंड उकीरडा
असल्यागत भासते.

उकरडा आधी अंगीं नरकांडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥1॥
कासयाने देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥धृ॥
काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥2॥
तुका म्हणे काय उपदेश वेड्या । संगे होतो रेड्यासवें कष्ट ॥3॥
ज्याच्या अंगी नरकासारखा उकिरडा असतो त्याला तसंच प्राप्त होतं. आंधळा माणिकं कसा पाहू शकेल? तोंडाला चवच नसेल तर चविष्ट अन्नही फिकं वाटून वाया जाईल. विषावर कितीही उपचार केले तरी त्याने ते विष बदलेल का? आपला विषारी गुणधर्म बदलेल का? म्हणून ते मुखापासून दूर ठेवणंच बरं. तुकाराम महाराज म्हणतात, वेड्याला उपदेश करुन काय उपयोग? रेड्यासारख्या निर्बुद्ध माणसाची संगत केली तर कष्टच होतात. त्या व्यक्तीला स्वातंत्र्याचचं काय ते स्वत: जन्माला आलेत याचं महत्त्व ही माहित नसतं. एक तर त्यांचा जन्मच नर अन् नारीच्या वासनांध सुखाचा प्रताप असतो आणि त्या प्रतापात जन्मलेला असाच बरगळतो.
स्वातंत्र्याला मृत्यू नाही
परंतू माणसाला मृत्यू

जन्म घेताना आपण मरण सोबत घेऊनच येतो. ज्याला जन्म आहे, त्याला म्रुत्यु आहेच. जातस्य ही ध्रुवो म्रुत्यु. जन्म होताक्षणीच म्रुत्युच्या दिशेने वाटचाल सुरु झालेली असते. शहिद शिरोमणी भगतसिंग आणि त्यांचे सहकारी सुखदेव, राजगुरु स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेले, तर चंद्रशेखर आझाद यांनी लढता लढता शेवटची गोळी स्वतःवर झाडून घेतली. हे सर्व क्रांतीकारक मरुन अमर झाले. ज्यांनी इंग्रजांची माफी मागितली आणि सुटका करुन घेतली तेही पुढे म्हातारे होऊन मेलेच ! पण जाताना भाळावर ’माफीवीर’ असा शिक्का घेऊन गेले. स्वतःच्या चारित्र्याला कायमचा डाग लावून गेले.
संताजी-धनाजींच्या घोड्यांनाही माहिती होतं, युद्धी जय किंवा मरण ! युगस्त्री जिजामाता, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले अठरापगड जाती आणि धर्मातले हजारो मावळे याच जिद्दीने लढले. म्हणून त्यांच्या कित्येक पटीने अधिक साधनसामुग्री, मनुष्यबळ, संपत्ती असलेल्या महासत्तांना धूळ चारुन ते या मातीत स्वराज्य निर्माण करु शकले, स्वराज्य राखू शकले, स्वराज्य प्रस्थापित करु शकले, स्वराज्याचा विस्तार करु शकले. संतशिरोमणी नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज ते जगद्गुरू तुकाराम महाराज या सर्व संतांनी इथल्या प्रस्थापित जुलूमी वर्णव्यवस्थेच्या विरोधात जो संघर्ष केला तोही जिंकू किंवा मरु; करु अथवा मरु याच जिद्दीने केला. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती यांच्यावर सनातन्यांनी मारेकरी घातले होते. पण मरणाची तमा न बाळगता त्यांनी आपलं कार्य सुरु ठेवलं आणि म्हणून ते काळाच्या भालावर आपल्या कर्तृत्वाची मुद्रा उमटवून गेले. कोणताही क्रांतीकारक मरण खांद्यावर घेऊनच जगत असतो. ’फिडेल कँस्ट्रो आणि चे गव्हेरा’ या क्रांतीकारकांनी क्युबात क्रांती घडवून आणली. पण ’चे गव्हेरा’ तिथे थांबले नाहीत. लँटीन अमेरिकेतल्या जनतेला गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी पुन्हा बंदुक हाती घेतली आणि जंगलं पालथी घालत, लोकात जाग्रूती करत फिरत राहिले. क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांचे तितकेच बेडर सहकारी मरण खिशात घेऊनच वावरत होते. त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातून सारा सांगली-सातारा इलाखा मुक्त केला. गांधींच्या विरांच्या अहिंसेने इंग्रजांची पळताभुई थोडी केली. किती नाव द्यायचे? किती शहीद सांगायचे? किती हुतात्मे दाखवून द्यायचे? सोडा हा विषय कंगना राणावत सारख्या र्निबुद्ध व्यक्तीला सांगणे म्हणजे पालत्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे. सवाल आज कंगनाच्या वाच्चाळपणाचा नाही तर सवाल आहे भारतीय अस्मितेचा. केंद्र सरकारने ज्या व्यक्तीला पद्मश्रीने सन्मानित केलं त्याच व्यक्तीला भारताचं स्वातंत्र्य भीक वाटत असेल तर ती व्यक्ती पद्मश्री देण्यास योग्य आहे का? तिचे हे वक्तव्य देशद्रोहाचे नाही का? आता तरी केंद्रातल्या सरकारने आणि भाजपाच्या विचारश्रेणीने असला शिंदळपणा खपवून घेवू नये.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!