दोन हायवासह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त
गेवराई (रिपोर्टर)-गेवराई तालुक्यात सर्रासपणे अवैध वाळू उपसा होत आहे. बीडहून आलेल्या एपीआय नवले यांना वाळू माफिया दिसतात. मात्र स्थानिक पोलिसांना ते दिसत नाही तर आज सकाळी दोन हायवासह 50 लाखांचा मुद्देमाल एपीआय नवले यांनी जप्त केला.
गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक हायवा क्र. एम.एच. 21 बी.यू. 9404 व हायवा क्र. यु.पी. 36 टी. 5822 हे दोन हायवा गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसभुवन फाटा येथून गेवराईकडे जात असताना नवले आणि त्यांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडे परवाना विचारला असता दोन्ही हायवांकडे कसलाही परवाना नव्हता. दोन्ही हायवा गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत. या प्रकरणी हायवा चालक रमेश रामभाऊ शिंदे (रा. गोंदी ता. अंबड), कृष्णा लक्ष्मण गिरी (रा. गोंदी ता. अंबड) दोघांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.