Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडरिपोर्टरचे पितृछत्र हरपले, हाजी शेख सिकंदर यांचे निधन

रिपोर्टरचे पितृछत्र हरपले, हाजी शेख सिकंदर यांचे निधन


बीड (रिपोर्टर)- तय्यब तू अब उनकी आवाज बन, जिन को हक के लिए लढना नही आता, जिन की आवाज दबाई जाती है, असे लढवय्या, प्रोत्साहन देणारे रिपोर्टरचे पितृछत्र म्हणजेच सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांचे वडिल हाजी शेख सिकंदर यांचे आज दुपारी औरंगाबाद येथील एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे एवढे होते. शेतकरी कुटुंबातला हा बाप स्वत:च्या मुलाबरोबर समाजासाठी आणि दुर्बलांसाठी सातत्याने कळवळा आणत होता. आज तो नसल्याने सायं. दैनिक बीड रिपोर्टर पोरके झाले. आज रात्री इशा नमाजनंतर बीड शहरातल्या तकिया मस्जिद कब्रस्तान येथे 8.30 वा. त्यांच्या पार्थीवदेहावर दफनविधी करण्यात येणार आहेत. रिपोर्टर परिवारावर प्रचंड मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


सायं. दैनिक बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्या शालेय जिवनापासून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा हा बाप माणूस महाविद्यालयीन शिक्षण नसताना आपल्या दोन्ही मुलांना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच समाज आणि दुर्बल पिडितांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे प्रोत्साहन देत राहिला. अठरापगड दारिद्रय असताना रक्ताचा घाम ओकत हाजी शेख सिकंदर यांनी संपादक शेख तय्यब यांच्या पाठिशी उभे राहून दिनदुबळ्यांचा आवाज बनण्याचे प्रोत्साहन दिले. गेल्या दोन महिन्यांपुर्वी त्यांना अल्पशा आजाराने ग्रासले. उपचारार्थ हाजी शेख सिकंदर यांना औरंगाबाद येथील एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज दुपारी 12 वाजता त्यांचे दु:खद निधन झाले. सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा पार्थीवदेह रिपोर्टर भवन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रात्री साडे आठ वाजता बीड शहरातील तकिया मस्जिद कब्रस्तानात इशाच्या नमाजनंतर पार्थीवदेहावर दफनविधी करण्यात येणार आहे. हाजी शेख सिकंदर यांचे निधनाने रिपोर्टरचे पितृछत्र हरपले आहे. रिपोर्टर परिवार शोकाकुल असून या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

12 1
31632085 1671611869623015 3017377845866397696 n
32693274 1672636599520542 4567563170855518208 n
32482971 1671716652945870 3030880845087899648 n

आम्ही सर्वांनी एक मार्गदर्शक गमावला -धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यातील अग्रगण्य सायंदैनिक बीड रिपोर्टर परिवाराचे आधारवड, मुख्य संपादक श्री. तय्यब भाई शेख यांचे वडील हाजी सिकंदर सहाब यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. एक सामान्य शेतकरी असूनही आपल्या मुलांना, कुटुंबाला उभे करून वृत्तपत्रासारख्या व्यवसायात दाखल केले. कायम सत्याच्या पाठीशी रहा, दीन-दुबळ्यांचा आवाज बनून समाजासमोर प्रेषित व्हा, अशी मोलाची शिकवण हाजी सिकंदर सहाब यांनी आपल्या मुलांना दिली. रिपोर्टर परिवारास उभे करण्यात हाजी सिकंदर सहाब यांचे मार्गदर्शन व मोलाचा वाटा आहे. समाजात वावरताना समाजाभिमुख पिढी निर्माण व्हावी यासाठी वृत्तपत्र हे देखील प्रभावी माध्यम आहे व त्याचा योग्य वापर केल्याने समाजात सकारात्मक बदल घडतात हे मानणारे व्यक्तिमत्व म्हणून हाजी सिकंदर सहाब यांचा लौकिक होता व कायम राहील. आज हाजी सिकंदर सहाब यांच्या निधनाने रिपोर्टर परिवाराने व आम्ही सर्वांनी एक मार्गदर्शक गमावले आहेत. त्यांची उणीव कायम भासत राहील. मी तय्यब शेख व समस्त रिपोर्टर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. हाजी सिकंदर साहेबांना भावपूर्ण आदरांजली..

Most Popular

error: Content is protected !!