बीड (रिपोर्टर) नगरपालिकेची प्रभाग रचना होऊन काल बीड नगरपालिकेने प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठीही काही मुदत मतदारांनी दिलेली आहे. मात्र ज्यांना या मतदार यादीवर आक्षेप घ्यायचा आहे त्यांना मतदार यादीची प्रत आक्षेप अर्जासोबत जोडावी लागते. या मतदार यादीचे एक पान नगरपालिकेकडून घ्यावयाचे असेल तर 10 रुपये एका पानाला याप्रमाणे एका प्रभागाची मतदार यादी घेण्यासाठी किमान संबंधिताला 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र हीच मतदार यादी झेरॉक्स सेंटरवरून घेतली तर ती चारशे ते पाचशे रुपयांना मिळते. नगरपालिकेने मुद्यामच मतदार यादीची किंमत मोठी ठेवून लोकांना अडचणीत टाकले आहे.
मतदार यादी आक्षेप घेताना शक्य तो या मतदार यादीची प्रमाणित केलेली प्रत जोडावी लागते. एका प्रभागाची मतदार यादी घेण्यासाठी जर चार ते पाच हजार रुपये आक्षेप घ्यायला मोजावे लागत असतील तर त्याला इतका आर्थिक भुर्दंड कसा सोसणार? हीच मतदार यादी झेरॉक्स सेंटरवरून चारशे ते पाचशे रुपयांना मिळते मात्र झेरॉक्स सेंटरवरील मतदार यादीत अनावधानाने काही चूक झाली तर नगरपालिका तो आक्षेप अर्ज स्वीकारत नाहीत. त्या आक्षेप अर्जाला नगरपालिका प्रशासनाने प्रमाणीत केलेली यादीच लागते. त्यामुळे नगरपालिका निवडणूक विभागाने आडमुठी धोरर सोडून किमान मतदार यादीचे पर पेज पाच रुपये दर करावा, अशी मागणी शहरातील सर्वच मतदारांकडून होत आहे.