Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडपाटोदाबिबट्याची दहशत कायम,बेदरवाडी शिवारात आज गाय आणि शेळीचा फडशा पाडला

बिबट्याची दहशत कायम,बेदरवाडी शिवारात आज गाय आणि शेळीचा फडशा पाडला


बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने एक मुलगा आणि एका व्यक्तीचा फडशा पाडल्यानंतर जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली असताना पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी शिवारामध्ये गोठ्यात बांधलेली गाय आणि शेळी यांचाही फडशा बिबट्याने पाडल्याने शेतकरी वर्गात या बिबट्याची प्रचंड दहशत पसरली असून वन विभागाच्या नाकर्तेपणाचा संताप पाटोदा, शिरूर, आष्टी तालुक्यातून व्यक्त केला जात आहे.


गेल्या दोन दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका पंचायत समिती सदस्याच्या पतीचा बिबट्याने हल्ला करून जीव घेतला तर काल किन्ही गावात एक पाहुणा म्हणून आलेल्या 12 वर्षीय मुलाचा जीव बिबट्याने घेतल्याची घटना घडल्याने या तिन्ही तालुक्यातील जनतेत बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे शेतकरी वर्गातून शेतीची कामे खोळंबलेली आहेत. वनविभाग गेल्या तीन दिवसांपासून या तालुक्यात ठाण मांडून बसला तरी या बिबट्याला जेरबंद करण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. या दोन घटना ताज्या असतानाच काल परत पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी शिवारातील शेतातील गोठ्यामध्ये बांधलेले गाय आणि शेळ्या बांधलेल्या होत्या. काल पहाटेच्या दरम्यान गोठ्यातील एका गाय आणि एका शेळीचा फडशा बिबट्याने पाडला. यामुळे गावातील शेतकर्‍यांत दहशत बसली आहे. आज सकाळी गावकर्‍यांनी ही माहिती वनविभागाच्या लोकांना दिलेली आहे

Most Popular

error: Content is protected !!