केजमध्ये बंडखोर आमदाराच्या विरोधात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत बंडखोर आमदारांचा निषेध केला. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, शिवदास मुंडे, युवा सेना तालुकाप्रमुख अरविंद थोरात यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.