Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडमजूर घेऊन जाणारा पिकअप पलटला; सहा जण जखमी

मजूर घेऊन जाणारा पिकअप पलटला; सहा जण जखमी


उदंडवडगाव जवळील घटना
नेकनूर (रिपोर्टर)- ऊसतोड मजुरांना घेऊन जाणार्‍या पिकअपचे टायर फुटल्याने पिकअप पलटी होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना रात्री मांजरसुंबा-उदंडवडगाव रोडवर घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


   ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा पिकअप (क्र.एम.एच. 07-सी.5805) चे रात्री टायर फुटल्याने पिकअप पलटी झाला. यामध्ये मजूर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये एका लहान बालकाचा समावेश आहे. हे मजूर घनसांगवी येथून कर्नाटककडे कारखान्याकडे जात होते. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान उदंडवडगावजवळ हा अपघात झाला. घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना झाल्यानंतर पोलिस नाईक विलास ठोंबरे, विठ्ठल सांगळे, अलताफ शेख, विकास थोरात, सुदाम वनवे यांनी धाव घेऊन जखमींना मदत केली

Most Popular

error: Content is protected !!