बीड/गेवराई (रिपोर्टर)ः- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राक्षसभूवन येथील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. स्थानीक पोलीसांना याची माहिती असतांनाही याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जात आहे. स्थानीक नागरीकांनी याबाबत एसपीकडे तक्रार दिल्यानंतर आज सकाळी गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे,पिएसआय संजय तुपे यांनी गोदापात्रात छापा टाकून अवैध वाळूसह आठ टॅक्टर आणि सात केन्या जप्त करुन चकलांबा पोलीसांची हप्तेखोरी उघड केली आहे. बीडवरुन जाणार्या पोलीसांना राक्षसभूवनमध्ये गोदापात्रातून उपसणार अवैध वाळू साठा आणि टॅक्टर दिसतात मात्र स्थानीक पोलीसांना ते का दिसत नाही असा सवाल पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केलेल्या नागरीकांनी केले आहे.
राक्षसभूवन येथील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे चकलांबा पोलीस दुर्लक्ष करत असल्याने राजरोजपणे हा वाळू उपसा सुरू होता. याबाबत स्थानीक नागरीकांनी चकलांबा पोलीसांना माहिती दिल्यानंतर माहिती देणार्यांचेच नावे वाळू माफीयांपर्यंत पोहचतात आणि ते माफीया स्थानीकांना दमदाटी करतात. त्यामुळे येथील काही नागरीकांनी पोलीस अधिक्षकांकडेच राक्षसभूवन येथील गोदापात्रातून अवैधरित्या रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याची महिती दिली होती. त्यानंतर एसपींनी आदेश दिल्यानंतर पिएसआय संजय तुपे अणि गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे,मंडळाधिकारी पखाले, तलाटी वाटोरे, टकले, शिंदे यांच्यासह पोलीस फौजफाटा घेवून तहसीलदारांनी राक्षसभूवनच्या गोदापात्रात सकाळी अकरा वाजता छापा मारला. त्यावेळी केनीच्या साह्याने वाळू उपसा करून तो ट्रॅक्टरमध्ये भरतांना पोलीसांनी आठ ट्रॅक्टर आणि सात केन्या जप्त करुन चकलांबा पोलीस ठाण्यात लावल्या. त्यांच्यावर रितसर कारवाई करणे सुरू आहे. या कारवाई नंतर चकलांबा पोलीसांची हप्ते खोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.