मतदारांसह भावी नगरसेवक गोंधळले
बीड (रिपोर्टर): नगर पालिका प्रशासनाने मतदार यादी प्रसिद्ध केली, या यादीमध्ये अनेक चुका झाल्या असून एकाच कुटुंबातल्या काही सदस्यांची नावे एका वार्डात तर काही सदस्यांची नावे दुसर्या वार्डात टाकण्यात आली आहेत. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काही वार्डात लोकसंख्या कमी मात्र मतदारांची संख्या जास्त दाखवण्यात आली आहे. या प्रकारामुळे मतदारासह भावी नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत. या सर्व चुकाबाबत आक्षेप नोंदवण्याची तारीख नगर पालिकेने जाहीर केलेली आहे. या आक्षेपात किती तक्रारी दुरूस्त होतात याकडे लक्ष लागून आहे.
नगर पालिका प्रशासनाच्या निवडणूका येत्या काही दिवसांवर घेण्यात येणार असल्याने मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. बीड शहरामध्ये एकूण 26 प्रभाग आहेत. मतदार याद्यामध्ये अनंत चुका असल्याचे दिसून आले. एकाच कुटुबातील अनेक मतदारांची नावे एका वार्डात तर काहींची नावे दुसर्या वार्डात, त्याच बरोबर एका वार्डातील रहिवाशांची नावे दुसर्या वार्डात समाविष्ट करण्यात आली आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लोकसंख्या आणि मतदार या आकड्यामध्ये मोठी तफावत आहे. प्रभाग क्र. 5, 6 आणि 8 यात लोकसंख्या कमी आणि मतदारांची संख्या जास्त आली याबाबत नगर पालिकेचे सिओ ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 2011 च्या लोकसंख्येनुसार मतदार यादी तयार करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या प्रकारामुळे मतदारासह भावी नगरसेवक चांगलेच गोंधळले आहेत.
प्रभाग क्र. लोकसंख्या मतदार
1 7654 3843
2 8438 5023
3 7242 5951
4 7443 6830
5 7186 8111
6 8198 9609
7 8319 6193
8 7563 8511
9 8296 6579
10 8228 5410
11 8367 5440
12 8436 6828
13 8446 7095
14 8298 6154
15 7239 6665
16 8172 4184
17 8268 6987
18 8166 7430
19 7273 7477
20 7263 5565
21 7385 4359
22 7142 3363
23 7348 6068
24 7198 5167
25 7260 3259
26 7702 4590