परळी (रिपोर्टर) सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी गेल्या वर्षभराच्या कालखंडात गुटखा माफियांविरोधात असंख्य कारवाया केल्यानंतरही बीड जिल्ह्यात गुटखा माफिये वेगवेगळ्या शक्कल लढवत गुटख्याची तस्करी करतच असल्याचे आज पुन्हा एकदा समोर येत असून आता थेट गुटखा माफियांनी डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधून गुटखा तस्करी करण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी ईटके कॉर्नर परिसरात डाक पार्सलचे कंटेनर अडवले असता त्यामधून सुमारे साडे दहा लाख रुपयांचा गुटखा मिळून आल्याने गुटखा माफियांनी आता जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने गुटखा आणण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. पो.ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
आज पहाटे 03.50 वा. इटके कॉर्नर परळी येथे कंन्टेनर पासींग क्र.एच.आर.55 टी.4271 मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद (वय 35 वर्षे रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारा कंटेनर आज परळी शहरातील ईटके कॉर्नर येथे पकडला. या प्रकरणी गु.र.नं. 131/2022 कलम 328,272, 273 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज अहेमद दारूद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 लाख 8 हजार रुपयांच्या 28 पांढर्या रंगाचे मोठे बोरे प्रत्येकी बोरमध्ये 8 पांढर्या रंगाचे पोते ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीत पान मसाला आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे 36 हजार रुपये असा एकूण 10 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याची किंमत 36000/- रुपये असा एकुण 1008000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असा एकुण 19,48000/ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पो. नि. एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सी. एच. मेढके पो.स्टे. संभाजीनगर परळी पो.उप. नी.सी.एच. मेढके हे करीत आहेत.