महिला व बालकल्याण विभागाचे दुर्लक्ष
पात्रुड (रिपोर्टर): 6 वर्षांपर्यंत घरा जवळच शिक्षणाचे धडे मिळावे याकरिता केंद्र व राज्य सरकारमार्फत अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात अंगणवाडीसेविका व मदतनीस कार्यरत आहेत. परंतु, महिला बालकल्याण विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. बर्याच अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी केंद्राच्या पुढे व बाजूला तसेच परिसरात कचर्याचे ढिगारे आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप पालकांकडून केला जात आहे.
अंगणवाडी जवळ मोठ्या प्रमाणावर
कचर्याचे साम्राज्य आहे. गावातील लहान चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देण्याकरिता शासनाच्यावतीने अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र,अनेक अंगणवाडीमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील पात्रुड येथील अंगणवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्याचे साम्राज्य दिसून येत आहे.अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचेसुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वी कचर्याचे साम्राज्य असल्याने अंगणवाडीमध्ये साप, विंचू व इतर कीटकांनी अंगणवाडीत प्रवेश करु शकते एकीकडे शासन मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही, असे सांगते. तर दुसरीकडे शासनाचेच अधिकारी-कर्मचारी लहान मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचाही आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.असाच प्रकार तालुक्यात अनेक अंगणवाडी केंद्रात दिसत आहे. कचर्याचे ढिगारे पडून असताना चिमुकल्यांना परिसरात खेळताना त्रास सहन करावा लागत आहे. यात जीवितहानी होण्याची भीती आहे. त्यातही अंगणवाडी सेविका, मदतनीस वेळेवर अंगणवाडीत येत नाही व वेळेच्या आधीच निघून जातात.काही पर्यवेक्षिका कार्यालयातूनच दौरे दाखवून प्रत्यक्षात ते अंगणवाडीला भेटी देत नाही.महिला बालकल्याण विभागाच्या अधिकार्यांनी त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.