सौताड्याच्या धबधब्याजवळ मोटारसायकल, चप्पल सापडली
पाटोदा पोलीसांकडून शोधाशोध सुरू
बीड, (रिपोर्टर)ः- आज मी फार खुष आहे, कारण मी परमनंट झालो, परंतु माझ्या कुटूंबातील आई, पत्नी यांची साथ मिळत नाही. अशा पध्दतीचे स्टेटस ठेवून एक शिक्षक कालपासून बेपत्ता झाला. या शिक्षकाची मोटारसायकल आणि चप्पल सौताड्याच्या धबधब्यापाशी सापडली. पाटोदा पोलीस या शिक्षकाचा शोध घेत आहेत. दुपारपर्यंत या शिक्षकाचा कुठेही पत्ता लागला नव्हता सदरील हा शिक्षक पाटोदा तालुक्यात कार्यरत आहे.
गजेंद्र गुंंडाळे हे पाटोदा येथे विशेष शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. काल हे शिक्षक बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापुर्वी त्यांनी व्हॅटसअॅप वर एक स्टेटस लिहले. त्यांनी आपल्या स्टेटस मध्ये म्हंटले आहे की, चुक भुल माफ असावी मी गुंडाळे जी.एल आज फार खुश आहे कारण मी आज परमनंट झालो, परंतु मला माझ्या कुटूंबातील कोणताही सदस्य (आई, पत्नी) यांची साथ नाही. त्यामुळे मी माझी आज रोजी जिवन यात्रा संपवत आहे. त्यामुळे मी या मॅसेजद्वारे आपणास कळवितो की, या बाबत कोणालाही दोषी ठरवत नाही. माझी आई माझी बायको माझे लेकरं, माझे आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील मित्र मंडळी यांचा व केज मतदारसंघातील मित्र मंडळी यांचा काहीही संबंध नाही त्यामुळे माझी जिवनयात्रा संपवत असल्याबाबत कसलाही संबंध नाही. अशा पध्दतीचे स्टेटस या शिक्षकांने आपल्या व्हॉटसअॅपवर ठेवलेले आहे.या स्टेटसमुळे नातेवाईक व मित्र परिवारात एकच खळबळ उडाली. याबाबत पाटोदा पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांकडून शोधाशोध सुरू आहे. या शिक्षकांची मोटारसायकल आणि चप्पल सौताड्याच्या धबधब्याजवळ आढळली असल्याची सांगण्यात येत आहे.