आष्टी (रिपोर्टर) उजनी ते खुंटेफळ ही योजना शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाची आहे. राजकीय द्वेषापोटी आ. सुरेश धस आणि आ. बाळासाहेब आजबे एकमेकांना दोष देत आहेत. त्यांच्या या राजकीय द्वेषातून या योजनेला आडकाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होईल, या योजनेसाठी सर्वांनी प्रयत्न करत ही योजना मार्गी कशी लागेल? याकडे लक्ष द्यावे. आपण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून सदरची योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले. दोन्ही आमदारांनी पॉझिटिव्ह विचार करावा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
आष्टी, पाटोदा मतदारसंघातील धस-आजबे यांचा सुरू असलेला आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा पाहता आज माजी आमदार भीमराव धोंडेंनी दोन्ही आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी आ. धोंडे म्हणाले की, आष्टी तालुक्याचा कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी उजनी ते खुंटेफळ ही योजना शेतकर्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी महत्वाची असून राजकीय द्वेषापोटी आ.सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे यांनी एकमेकांना दोष दिल्यास ही योजना थांबेल शेतकर्यांचे सर्वसामान्यांचे नुकसान होईल कुकडीच्या पाण्यासाठी मी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला होता दोन्ही आमदारांना माझी विनंती आहे की उजनी ते खुंटेफळ योजना करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत याबाबत मुख्यमंत्री व फडणवीस साहेबांना भेटून योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा आ.भिमरावजी धोंडे यांनी आज दि.18 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आष्टी येथील आनंद भवन कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुढे बोलताना म्हणाले की उजनी ते खुंटेफळ कृष्णा मराठवाडा करार 23 टीएमसी मराठवाड्यात वाटेला आलेले 5 टीएमसी कमी करुन 18 टीएमसी आले उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात कामे प्रगतीपथावर सुरू असून आपली ही योजना मागे पडली आहे.मी या योजनेसाठी भरपूर प्रयत्न केला कुकडीचे पाणी येण्यासाठी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला पर्यावरण मंत्री प्रकाश जी जावडेकरांना भेटून ही योजना उभी राहिली दोन्ही आमदारांनी एकमेकांना दोष देत बसले तर योजना थांबेल सर्वांनी योजना पूर्ण होण्यासाठी मिळून प्रयत्न करावा शेतकर्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी महत्वाची योजना आहे.1.68 टीएमसी ऐवजी 5.68 टीएमसी पाणी याच योजनेद्वारे आणण्यासाठी सुधारणा करावी दोन्ही आमदारांना िेीळींर्ळींश विचार करावा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटून योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी सांगितले