बीड (रिपोर्टर) शहरातील सेंट अॅन्स स्कुलमध्ये शिक्षण घेणारा यश पांडुरंग कुरे या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीच्या आयसीएसई परीक्षेत 97.27 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून शाळेतील शिक्षकांसह पालकांनी आणि आप्तस्वकियांनी त्याचे अभिनंदन केले.
इयत्ता दहावीच्या आयसीएसईसाठी यश पांडुरंग कुरे याने गेल्या काही दिवसांपुर्वी परीक्षा दिली होती. शहरातील सेंट अॅन्स स्कुलमध्ये तो शिक्षण घेत आहे. सदरची परीक्षा ही अत्यंत अवघड असते. मोठ्या मेहनतीतून यश पांडुरंग कुरे याला 97.27 टक्के गुण परीक्षेमध्ये मिळाले आहेत. त्याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांसह, पालकांनी कौतुक करत अभिनंदन केले. यश यास 97 टक्के गुण मिळाल्यानंतर डॉ. सोमनाथ शिंदे, डॉ. हुबेकर, डॉ. सुमित मसुरे, डॉ. अबोली मसुरे, अविनाश काळे, रविदादा पवार, देवा पेंडारे, हरी क्षीरसागर, सुदर्शन हेरकर, श्यामसेठ क्षीरसागर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, सतीश राऊत, नागसेन क्षीरसागर, रवि शिंदे, विजय शिंदे, चंदनशिव शिंदे, देवीदास एकशिंगे, यांनी अभिनंदन केले. यश याचे पुढील शिक्षणासाठी शाहू कॉलेज लातूर येथे निवड झाली आहे.








