Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात,जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत, धनंजय...

आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात,जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत, धनंजय मुंडेंनी दिला आठवणींना उजाळा

धनंजय मुंडेंनी दिला आठवणींना उजाळा

बीड ( रिपोर्टर )-भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज, १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना, ‘आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात’ असे म्हणत आपल्या खास शैलीत अभिवादन केलं आहे.

धनजंय मुंडे यांनी ट्विट करत काका गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करत अभिवादन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत असेही म्हटले आहे. ट्विट करत धनजंय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

धनंजय मुंडे यांचं ट्विट –
“आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.”


दुसऱ्या एका ट्विटमध्ये धनजंय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवार साहेब.. एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे. राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे, आदरणीय पवारसाहेबांना जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Most Popular

error: Content is protected !!