फडणवीसांचा शरद पवारांना फोन, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंनाही शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण,महाविकास आघाडीतील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती
मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ ग्रहण करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील . तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी आझाद मैदानावर भव्य तयारी करण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील महत्त्वाच्या नेते आणि अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसह, राज्यातील बड्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले आणि मनसचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. तर, राज ठाकरेही मित्र देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला येणार नाहीत, अशी माहिती आहे.
शरद पवार उद्धव ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार नाहीयेत. महाविकास आघाडीकडून कोणीही या शपथविधीला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शरद पवारांना फोन करत शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. मात्र, शरद पवार सध्या दिल्लीत असल्याने ते शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतील एकमेकांच्या विरोधात लढले. यादरम्यान, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र, आता निवडणूक संपल्यानंतर फडणवीसांनी राजकीय वैर बाजुला ठेवत शरद पवारांना फोन करुन शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. मात्र, दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु असल्याने शरद पवार दिल्लीत आहेत. त्यामुळे शरद पवार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.
चौकट
सत्तारोहणापूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून धार्मिक अनुष्ठान-
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या दर्शनाला पोहचले. शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत देवदर्शन केलं. देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या चरणी लीन झाले. तर सागर बंगल्यावर होणार गोमातेचं पूजन करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पूजेसाठी गाय आणण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वेळात बंगल्यावर पोहचतील. त्यानंतर गोमातेचं पूजन केलं. देवेंद्र फडणींवीसांनी गौमातेची पूजा केली. बळीराजाचं राज्य यावं म्हणून ही पूजा करण्यात आली आहे. गीर आणि खिल्लार प्रजातीची गाय आण्यायात आली होती.
Mm¡gmim – OdiM Agboë¶m qhJUr (~w) ¶oWrb eoVH$ar ehmOr dm¶go ¶m§À¶m Kam~mhoa R>odbob§ gmo¶m~rZMr 62 H$Å>o ~wYdmar ‘ܶamÌr Mmoê$Z Zoë¶mMr KQ>Zm KS>br. ¶m KQ>Zo‘wio Mm¡gmim n[agamV ^rVrMo dmVmdaU {Z‘m©U Pmbo Amho.
आम्ही सर्व आमदार त्यांना रात्री एकत्र भेटलो. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कॅबिनेटमध्ये आलं पाहिजे. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे. त्यांनी सकारात्मक विचार करण्यास संमती दिली. ते मोदी आणि शाहांचं खूप ऐकतात. तिथून संदेश आला तर एकनाथ शिंदे कधीच त्यांचा संदेश धुडकावणार नाहीत – दीपक केसरकर