ंअंबाजोगाई (रिपोर्टर): वस्तीगृहात राहत असलेल्या मुलांना रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जेवण दिल्यानंतर एक तासाने या सर्व मुलांना मळमळ, उलटी होऊ लागली. वस्तीगृहातील मुलांना विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये 13 जणांना उपचारार्थ दाखल केले. सकाळपर्यंत या मुलांचा आकडा 28 वर गेला होता. सदरची घटना ही अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा या गावी घडली. 28 मुलांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासह जेवण आणि राहण्याची सोय राज्य सरकारच्या जिल्हा परिषद विभागामार्फत दरवर्षी हंगामी वस्तीगृहामार्फत केली जाते. अंबाजोगाई तालुक्यातल्या येल्डा या गावी असेच वस्तीगृह असून या वस्तीगृहामध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी राहण्यास आणि खाण्यापिण्यास असतात. रात्री नेहमीप्रमाणे आठ वाजण्याच्या सुमारास या मुलांना जेवण देण्यात आले. त्यामध्ये वांग्याची भाजी, चपाती, भात हे जेवण होते. मुलांनी रात्री जेवण केले आणि सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास यातील काही मुलांना मळमळ, उलटी होऊ लागली. रात्री दहाच्या नंतर 13 मुलांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यातच आले. सकाळपर्यंत विषबाधा झालेल्या मुलांची संख्या 28 वर गेली होती. उपचार घेत असलेल्या मुलांमध्ये मुकुंद रामप्रसाद चामणर, प्रतीक्षा मकरंद चामणर, रुपाली बबन वाघमारे, सुरेश बाळु शिंदे, श्रावणी लहू कांबळे, विनोद दशरथ चामणर, क्रांती दशरथ चामणर, अभिषेक कांबळे, श्लोक कांबळे, स्वाती शिवाजी कांबळे, अमोल भागवत कांबळे, रितेश शिवाजी कांबळे, सानवी परमेश्वर चामणर, पवंजली भागवत कांबळे, सानिया धम्मपाल हतागळे, रोहीत मुकुंद चामणर, राघव धम्मपाल हतागळे, प्रज्वल शहाजी पाटोळे, कृती अविनाश कांबळे, कृष्णा दिगांबर सोनवणे, राजपाल धम्मपाल हतागळे, अनन्या सायस गवते, वीर शिवाजी कांबळे, सांस्कार नितीन कांबळे, अपर्णा अनिल टालकसे, अंकिता अनिल टालकसे, स्वाती मारुती खोडवे, पृथ्वीराज रमेश शेंडगे, कोमल रमेश शेंडगे, श्रृष्ठी चामणर, पृथ्वीराज चामणर, ऋषिकेश माने, आत्तम शहाजी पाटोळे, शितल युवराज लवरे, या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येते.