बीडचे फिंगर प्रिंट पथक घटनास्थळी
चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रोकड सह 7 तोळे दागिने केले लंपास
आष्टी (रिपोर्टर) तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोर्यांचे सत्र सुरूच आहे. धामणगांव शहरातील मुळे वस्तीवर चक्क भरदिवसा घरफोडीच्या घटना घडली आहे. चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रोकड सह 7 तोळे दागिने लंपास केले असून घटनास्थळाचा अंभोरा पोलिसांनी पंचनामा करून बीडच्या फिंगर प्रिंट पथक ही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे. चोरीच्या घटना वाढल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील आण्णा रामभाऊ मुळे हे शेतात काम असल्याने घर लावून गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी दि.28 जुलै रोजी दुपारनंतर घरफोडी करत घरातील 7 तोळे दागिने,व पाहुण्यांना घर बांधकामाला देण्यासाठी आणलेले 1 लाख 50 हजार घरात ठेवले होते. चोरट्यांनी रोकडासह दागिने घेऊन पोबारा केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी पंचनामा केला असून बीडच्या फिंगर प्रिंट पथकाने ही पाहणी केली आहे. यावेळी अंभोरा पोलिस देशमाने, केदार, तालवे मॅडम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी सरपंच अमोल चौधरी, उपसरपंच विजय गाढवे उपस्थित होते. याबाबत अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.