Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआयकर विभागाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीची तिव्र निदर्शने

आयकर विभागाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीची तिव्र निदर्शने


पवार कुटुंबियांवर जाणीवपूर्वक
आयकर विभागाच्या धाडी
आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू
नये – आ. संदीप क्षीरसागर

बीड(प्रतिनिधी):- केंद्रीय आयकर विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाच्या उद्योगावर राजकीय द्वेषातून छापे मारले जात आहेत. याचा बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध करत आयकर विभागाच्या निषेधार्थ आज जिल्हा-धिकारी कार्यालयासमोर आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने केली. केंद्रीय आयकर विभागाचा धिक्कार असो, भाजप सरकारचं करायचं काय, यासह इतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20211012 WA0012


केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समर्थमानार्थ बीड जिल्ह्याधिकारी कार्यालया-समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड च्या वतीने निदर्शने करण्यात आली. अजितदादांवर अनेकदा आरोप टिका झाली आम्ही संयमाने प्रत्त्युतर दिले पण, तुम्ही जर विनाकारण आमच्या आई बहिणींच्या घरी धाडी टाकुन प्रसिद्धीचा आव आणत असाल तर जास्त काळ सहन करणार नाही. आम्ही पवार कुटुंबियांवर जिवावर उदार होऊन प्रेम करतो म्हणुन तुम्ही आमच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये. जेवढं दाबायचा प्रयत्न कराल, त्याच्या दुप्पट ताकदीने ते पलटवार करू. आता धाडी थांबवा नाहीतर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरुणांचा ही संयमाचा बांध फुटेल असेही आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले.
यावेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी आ.सयद सलीम, माजी आ. सुनील धांडे, माजी.उषाताई दराडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अ‍ॅड डी. बी बागल ऍड खोसरेताई,संगीता तुपसागर,कमल ताई निंबाळकर ता महादेव उबाळे, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!