स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः-ओमिनी कारमध्ये गुटखा जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी गाडी ताब्यात घेवून त्यातील गुटखा जप्त केला. गुटख्यासह ओमिनी कार असा एकूण 1 लाख 15 हजार 66 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मौजे डोंगरपिंपळा याठिकाणी करण्यात आली.

अंबाजोगाई येथून चनई रोडने एका पाढर्या ओमिनी कारमध्ये गुटखा जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला झाल्यानंतर डोंगर पिंपळा येथे हनुमान मंदिरासमोर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली . गाडी पकडताच गुटखा वाहतुक करणारा इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. सदरील इसमाचे नाव कृष्णा मुकूंद भालेकर (रा.स्वातंत्र्य सैनिक कॉलनी मोरेवाडी ता,अंबाजोगाई) पोलिसांनी गाडीतील सुगंधीत पान मसाला गुटखा व ओमिनी गाडी असा एकूण 1 लाख 15 हजार 66 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हा शाखेचे शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस उपनिरिक्षक सुशांत सुतळे, पो.ह.मारूती कांबळे, विकास राठोड, महेश जोगदंड, राजु पठाण, नितीन वडमारे, विक्की सुरवसे यांनी केली.