• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड जिल्ह्याला पाणीदार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रण

by गणेश सावंत
April 19, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गडाला दत्तक घेण्याची पात्रता नाही, तुम्ही मला दत्तक घ्या-मुख्यमंत्री
मिडियावाले बीडच्या वाईट गोष्टी दाखवतात इथे 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात.


बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यातल्या काही वाईट घटना मिडियाचे लोक वारंवार दाखवतात तो त्यांचा अधिकार आहे. परंतू या बीड जिल्ह्यात गेल्या 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात. हा जिल्हा संतांचा जिल्हा आहे. वारकर्‍यांचा जिल्हा आहे, अध्यात्माचा जिल्हा आहे यामुळेच या जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसांना वाईट गोष्टीविरोधात लढण्यासाठी ताकद मिळते. आता आष्टीपर्यंत पाणी आणलं आहे. अखंड बीड जिल्हा पाणीदार करणार असल्याचे सांगून समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच गोदावरी खोर्‍यात आणले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हंटले.गडाला दत्तक घेण्याची माझी लायकी नाही, पात्रता नाही, विठ्ठल महाराज तुम्ही मला दत्तक घ्या आपण सर्वांनी मिळून गडाचा विकास करू, गडावर येणार्‍या भक्तांचा विकास करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घाटशिळ पारगाव या ठिकाणच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात दिला.


ते गहिनीनाथ गडाच्या 93 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी घाटशिळ पारगाव या ठिकाणी आले होते. यावेळी व्यासपिठावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.नमिता मुंदडा, आ. मोनिका रागळे, शंकर देशमुख, समीर काझी, प्रताप ढाकणे, दादासाहेब मुरकुटे, भिमराव धोंडे, नवनाथ खेडकर, लक्ष्मण हाके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मला मनापासून समाधान आहे, 93 वर्षापासूनच्या सुरू असलेल्या परंपरेत मला यायची संधी मिळाली. संत वामनभाऊ यांचे आशिर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले. बीड जिल्ह्यात सप्ताहाची परंपरा मोठी आहे. हा संतांचा जिल्हा आहे, हा वारकर्‍यांचा जिल्हा आहे परंतू मिडीयाचे लोक वारंवार इथल्या वाईट गोष्टी दाखवतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु या जिल्ह्यात 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात.  हेही तेवढेच खरे, अध्यात्माच्या ऊर्जेतूनच बीड जिल्हा अनेक अडचणींचा सामना करतो आणि त्याच्यावर यशही मिळवितो. गोपीनाथराव मुंडेंच्या आशिर्वादाने मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या बीड जिल्ह्याचे आणि माझे नाते एक वेगळे झाले आहे. गेल्या वर्षापासून या गडाच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. गडाला दत्तक घेण्याची माझी पात्रता नाही, विठ्ठल महाराज तुम्ही मला दत्तक घ्या, आपण सर्व मिळून या गडाचा विकास करू, बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे. या जिल्ह्याला पाणीदार करायचे आहे. आष्टीपर्यंत पाणी आणलं, संतांच्या आशिर्वादाने समुद्रात वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोर्‍यात आणणार आहे. त्या कामाला मंजूर मिळाली आहे. नक्कीच 21 टिएमसी पाण्यापैकी केवळ 7 टिएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळतं परतु आता कोयना खोर्‍यातलं 30 टिएमसी पाणी वळण बंधार्‍यातून बीड जिल्ह्यात आणणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.संतांचे विचार हे माणूस जोडणारी परंपरा असल्याचे सांगून मला या गडावर बोलविले नाही तरी भक्त म्हणून मी गडावर येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.


वामनभाऊंची गादी कडक
त्यांचा वाचा सिध्दी होती-ना.पंकजा मुंडे


दोन महिन्यापुर्वी चाकूर येथील नागरीकांना कार्यक्रमाबद्दल शब्द दिला होता. मात्र आज मुख्यमंत्री येथे येणार म्हंटल्यावर मी त्यांना कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा ते नाराज झाले. मात्र पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्यांना सोबत घेवून कार्यक्रमाला येईल हा शब्द चाकूरकरांना दिला. हा भाग सातत्याने दुष्काळाचा भाग आहे अशा परिस्थितीत  सर्व सामान्य माणसं हे भक्ती मार्गाला लागावेत ती अन्यत्र भरकटू नयेत म्हणून संत वामनभाऊंनी सप्ताह सुरू केले. लोकांना अध्यात्माच्या मार्गाला लावले. संत वामनभाऊंची गादी कडक आहे, त्यांना वाचा सिध्दी होती असं म्हणत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी हा गड दत्तक घ्यावा असं म्हणत सत्तेशिवाय विकास होत नाही. मी पालकमंत्री असतांना या गडाचा विकास केला. माझ्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माझ्यापेक्षा जास्त विकास केला आज जरी मी या जिल्ह्याची पालकमंत्री नसले तरी पालक म्हणून मुख्यमंत्र्यांना मागणी घालते हा गडा त्यांनी दत्तक घ्यावा असं ही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Previous Post

जिल्ह्यात वैशाख वणवा

Next Post

रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
Next Post

रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?