3 प्रसुत महिला मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची केली मागणी
बीड, (रिपोर्टर) ः जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यात 3 प्रसुत महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी आज शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेत मयत महिलांच्या मृत्यू प्रकरणी दोषी डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी करत प्रसुती विभागाची पाहणी केली.

बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसुत झालेल्या 3 महिलांचा आठ दिवसात मृत्यू झाला. हा प्रकार वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. सामान्य रुग्णांवर चांगले उपचार व्हावे अशी अपेक्षा असते. आज सकाळी डॉ. ज्योती मेटे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत शल्यचिकित्सक डॉ. राऊत यांच्याशी चर्चा केली. महिलांच्या मृत्यू प्रकरणी दोषी असणार्या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. मेटे यांनी प्रसुती विभागाची पाहणी देखील केली.