ग्रामसेवकाची माहिती देण्यास टाळाटाळ
ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

बीड, (रिपोर्टर)ः- वांगी ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या काही महिन्यात विविध विकास कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसाची लुट करण्यात आली. या सर्व कामाची माहिती ग्रामसेवकाला विचारली असता ते माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज सकाळी एका नागरीकाने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.
हरिभाऊ रावण शेळके यांनी वांगी ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागिवली होती. घनकचरा, पाणी पुरवठा योजना, वित्त आयोग यासह जी काही कामे झालेली आहेत त्याची माहिती देण्याबाबत अर्ज दाखल केलेला आहे. मात्र गावचे ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज हरिभाऊ शेळके यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले होते.