गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
महाराष्ट्राचा द्वेष केला की आपले पितृ स्वर्गात गेल्याचा आभास काहींना सातत्याने होतो. महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली म्हणजे दिल्लीश्वराच्या उपकाराची परतफेड झाली, असे अनेकांना वाटते. महाराष्ट्राला आपल्या मुख गटारातून द्वेष भावनेने उद्ग्नीत केले म्हणजे आपल्या मालकाला जोहार घातला, असे अनेकांना वाटते. दिल्लीचा महाराष्ट्र द्वेष आजचा नाही. सोळाव्या शतकापासून हा द्वेष आम्ही पहात आलो आहोत. फरक एवढाच स्वाभिमानी मराठी माणूस दिल्लीश्वराला कधी पाठ दाखवतो आणि दिल्ली तक्ताला आव्हान देतो, आता अशाच स्वाभिमानी आव्हान देणार्या मराठी माणसाच्या कर्तृत्व-कर्मावर दिल्लीश्वराच्या गुलामांनी आक्षेप घेतला. शेम…शेम… कोण हा दिल्लीश्वराचा गुलाम, तो तोच केवळ दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून आघाडी सरकारमधल्या बारा आमदारांना लटकवत ठेवणारा तो तोच राष्ट्रपती राजवट लागू करून पहाटेच्या दरम्यान राष्ट्रपती राजवट उठवण्याची शिफारस करणारा, पहाटेच दिल्लीश्वराच्या नुमाईंद्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देणारा, तो तोच मुख्यमंत्री शिंदेंना पेढा भरवणारा अन् महाराष्ट्राच्या मातीत निपजणार्या अन्य राजकीय पक्षांना पाण्यात पाहणारा. भगतसिंंह कोश्यारी. आम्ही इथं राज्यपाल या संविधानात्मक पदाचा मान राखत आलो. म्हणून कोश्यारी यांच्या आजपर्यंतच्या बेकायदा घडामोडींवर व्यक्त झालो नाही. मात्र लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यात ज्यांनी संविधान दिलं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेनुसार ‘सत्यासाठी कायदा हातात घेतला तरी चालतो’ म्हणजेच संविधानाचाचे कोणी मोडतोड करत असेल, संविधानिक पदावर राहून कोणी कायद्याचा गैरवापर करत असेल तर अशाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जेव्हापासून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती झाली तेव्हापासून कोश्यारी यांनी केवळ भाजपाला मुजरा अन् जोहार घालत अन्य राजकीय पक्षांना पाण्यात पाहितलं. कोश्यारींची ही भूमिका अन् भाजप या पक्षाची एकनिष्ठता याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. मात्र कोश्यारींची मजल जेव्हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावण्यापर्यंत जाते तेव्हा महाराष्ट्रात निपजलेला व्यक्ती शांत बसणार नाही. कधी या माणसाने संविधानाला माणलच नाही. या माणसाची नजर एवढी शापीत आणि घृणास्पद आहे अशा, माणसाचा उल्लेख त्यांच्या हिडीस वागणुकीवरून थेट
शुद्र मांजराच्या
वक्षस्थळावर
वाकडी नजर टाकणारा असा केला तर तो चुकीचा ठरणार नाही. गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कालखंडात गुलामाचे इमान कसे असते हे उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने भगतसिंह कोश्यारी यांच्या वागणुकीवरून पाहिले आहे. भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल, दिल्लीश्वर ज्या सुचना देतील त्या सूचनांवर चालणे एवढेच काम कोश्यारी यांनी गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडात केले. असो ते कोणाचे गुलाम, ते कुणाची चाकरी करतात याचे आम्हालाच काय उभ्या महाराष्ट्रालाही याचे देणेघेणे नाही, परंतु अखंड हिंदुस्तानच्या संविधानिक पदावर ज्यावेळी एखादा व्यक्ती बसतो तेव्हा त्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीकोनातून सर्व लोक सारखे असतात अन् इथेच भगतसिंह कोश्यारींची नजर ही शुद्र मांजराच्या वक्षस्थळापर्यंत जातेय, हे म्हणण्याचं आम्ही इथे धाडस करतोय. राज्यपाल हा एखाद्या राज्याचा पालक असतो, राज्यपालाचे कर्तव्य सत्ताधारी अथवा विरोधक त्या राज्यातील रयतेला त्रास देत असतील, पिळवणुक करत असतील, अन्याय-अत्याचार, भ्रष्टाचार करत असतील अशांना सुतासारखं सरळ करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असतं. मात्र इथं सत्ताधारी असोत वा विरोधक असोत राजकारणातला सर्वात मोठा व्याभिचार गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात झाला. तो व्याभीचार रोखण्यासाठी कोश्यारींनी कधी आवाज उठवला नाही. सत्तेचं साक्षात वस्त्रहरण होत आलं, मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींना जो वर्षा बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावर जणू बलात्कार होतोय, अशी परिस्थिती अनेक वेळा निर्माण झाली. इथं हा व्यक्ती काहीच बोलला नाही.
दिल्लीच्या जे पोटात आहे
ते कोश्यारींच्या ओठात
सातत्याने पहायला मिळालं. महाराष्ट्राबाबत द्वेष हातर सातत्याने दिसून येत होता, मात्र अखंड हिंदुस्तानाच्या दैवतांवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर जेव्हा कोश्यारीसारख्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया येत गेल्या तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाची तळपायाची आग मस्तकाला गेली. थेट छत्रपतींबाबत बोलताना अभ्यास नसलेला हा व्यक्ती ‘चाण्याक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालयं. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात, असं म्हणतो आणि महाराष्ट्राला दुखवतो. यापुढे जात महात्मा फुले अन् सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वक्तव्य करताना हा माणूस म्हणतो, कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न १० वर्षी झालं, तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे १३ वर्ष होतं. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, हे त्यांचे वक्तव्य म्हणजे मराठी माणसाचा अपमान. महाराष्ट्राचा द्रोह, इथपर्यंत या माणसाने थांबणे अपेक्षीत होते. महाराष्ट्राचा अभ्यास करणे, मराठी मनाचा वेध घेणे गरजेचं होतं. परंतु हुजरा, मुजरा आणि जोहार घालणार्या व्यक्तीला आपल्या मालकाशिवाय काहीच दिसत नाही. तसे कोश्यारींना दिल्लीश्वराशिवाय काहीच दिसत नाही. म्हणूनच कोश्यारींनी काल
महाराष्ट्राच्या मनगटाला
आव्हान दिले.
अन् दिल्लीश्वरांचा हा गुलाम जाहीर कार्यक्रमातून बोलला. महाराष्ट्र आणि मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानींना बाहेर काढले तर महाराष्ट्रात पैसा राहणार नाही. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही, भगतसिंह कोश्यारींचं हे वक्तव्य मराठी माणसाला डिवचणारा आहे. महाराष्ट्राचं मनगट नेभळट असणारं दाखवणारं आहे. परंतु मराठी माणसाचं मन मनगट आणि मस्तक आजही तेवढेच तालीवार, जोशीले आणि आव्हान स्वीकारणारे आहे. तेव्हा मोरारजींच्या काळामध्ये महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा झाली होती, ज्या कारंज्यातून पाण्याचे फवारे निघत होते केवळ महाराष्ट्रात मुंबई राहावी म्हणून १०७ हुतात्म्यांच्या शरीरातून रक्ताचे कारंजे निघाले. मुंबईसाठी १०७ हुतात्मे झाले. हा स्वातंत्र्यानंतरचा कार्यकाळ परंतु त्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी जी लढवय्या भूमिका घेतली, जे स्वराज्य उभा केले, तो इतिहास तेवढाच जाज्वल्य आणि सुर्यप्रकाशाइतका स्वच्छ. इंग्रजांविरोधात लढताना याच महाराष्ट्राने संतापासून क्रांतीकार्यांपर्यंत स्वदेशासाठी लढा उभारला त्या लढ्यात रक्तमांसाचा चिखल याच मराठी माणसाने उभ्या देशाला दिला अन् स्वातंत्र्याचा श्वास मिळवला. जेव्हा हिमालयावर आक्रमण झाले तेव्हा त्याच्या मदतीला सह्याद्री धावून गेला आणि अशा डोळे दिपवणार्या इतिहासात महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाच्या कर्तृत्व कर्माबद्दल भाष्य करत गुजराती आणि राजस्थान्यांमुळे महाराष्ट्रात पैसा आहे, असं म्हणण्याची हिंम्मत आणि महाराष्ट्राची अवहेलना करण्याची हिम्मत या माणसात येते कुठून? केवळ आणि केवळ दिल्लीश्वराला ओवाळणी घालण्याहेतू शाब्दीक पुष्पांचे हारतुरे व्यासपीठावरून कोणी घालत असेल तर ते शाब्दीक पुष्प महाराष्ट्राच्या एखाद्या लेकराच्या मैलावर आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. कोश्यारींची ही भूमिका निषेधार्हच. आम्हाला वाटतं, राज्यपाल हे संवैधानिक आहेत, ते सर्वांचे आहेत, राज्यांचं पालकत्व त्यांच्याकडे आहे, अशा वेळी कोणी त्यांच्याकडे पितृत्वाच्या भूमिकेने पहावे, कोणी पालकाच्या भूमिकेने पहावे तर कोणी आजोबाच्या भूमिकेने पहावे परंतु राज्यपालांची भूमिका जर असंवैधानिक असेल तर इथं महाराष्ट्राच्या मातातला लहान पोरगाही असंवैधानिक भूमिका बजावणार्याच्या धोतराला हात घातल्याशिवाय राहणार नाही.