बीड (रिपोर्टर):- आता कोरोना गेला म्हणून लोक छोट्या-मोठ्या कार्यक्रमासह लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत. या कार्यक्रमादरम्यान कोरोनाचे कुठलेच नियम पाळले जात नाहीत. नवरदेव नवरीसह एकाही वर्हाडी मंडळीच्या तोंडाला मास्क नसते त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा मुसंडी मारू लागला आहे. आरोग्य विभागाला आज केवळ ३९८ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये तब्बल ४६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बीडमध्ये १९ रूग्ण आहेत.
बीड जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून तो १६ हजाराच्या पुढे गेला आहे. आज आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ३९८ अहवालामध्ये ३५२ जण निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ८, आष्टी १२, बीड १९, गेवराई,केज प्रत्येकी २ तर माजलगाव, परळी, पाटोद्यात प्रत्येक १ रूग्ण आढळून आला आहे.