Saturday, January 23, 2021
No menu items!
Home बीड सिंधफना नदीपात्रात जप्त वाळू प्रकरणी तिसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच

सिंधफना नदीपात्रात जप्त वाळू प्रकरणी तिसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच


गेवराई (रिपोर्टर) कोपरा येथील जप्त वाळू साठयाचा खुल्या बोलीद्वारे फेरलीलाव करावा व वाळू चोरी प्रकरणी संबधित अधिकार्‍याची चौकशी करून निलंबीत करावे या मागणीसाठी युवानेते दत्ता जाधव सहकार्‍यांसह सिंधफना नदीपात्रात महसूल प्रशासनाच्या विरुद्ध बेमुदत उपोषणास बसला आहे.तहसीलदार खाडे व मंडळ अधिकारी येवले यांनी उपोषणास काल भेट दिली,परंतु जप्त वाळू साठ्याच्या बाजूला अजून काही शेकडो ब्रासचे वाळू साठ्याकडे दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात असून वाळू माफियांशी महसूल प्रशासनाची मिलीभगत समोर येत आहे.यामुळे जिल्हाधिकारी रेखावार साहेब आपण स्वतःच या जप्त वाळूसाठ्याजवळ दुसर्‍या वाळूसाठ्यावर कार्यवाही करावी व माझ्या मागणीची दखल घ्यावी नसता मला शेवटचा म्हणजे आत्मदहणाचा निर्णय घ्यावा लागेल असे खळबळजनक पत्र दत्ता जाधव यांनी जिल्हाधिकारी रेखावर यांना लिहले आहे.


मौजे.कोपरा येथे दि.२२ नोव्हेंबर रोजी वाळू साठा जप्त केला होता.परंतु या वाळूचा लिलाव लवकर न करता वाळू चोरून,जाण्यास वाळू चोरास मदत प्रशासनाची झालेली आहे. तसेच वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देऊन देखील खुल्या बोलीद्वारे लिलाव न करता थेट गुत्तेदाराला वाळू दिलेला आदेश रद्द खुल्या बोलीद्वारे फेरलीलाव करावा व वाळू चोरीप्रकरनी दोषी अधिकार्‍यावर कार्यवाही करावी यासाठी दत्ता जाधव यांचे सिंदफना नदीपात्रात कडाक्याच्या थंडीमध्ये देखील तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाकडे राजकीय दबावापोटी दुर्लक्ष केले जात असल्याचे देखील नागरिकांतून आरोप केले जात आहेत.आता पत्राची तरी जिल्हाधिकारी साहेब दखल घेणार की काही दिवसांपूर्वी शेतकर्‍यांनी अधिकार्‍याच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केली,त्याप्रमाणे होऊ देणार याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Most Popular

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...

ना. मुंडे विरुद्ध ची तक्रार मागे घेतल्या नंतर रेणू शर्माने केले ट्टिट, म्हणाली……….

बीड -रिपोर्टर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार पोलिस स्टेशन मधून मागे घेतली असून...

जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम आदमी रस्त्यावरच बसणार

विभागीय अध्यक्षानंी नगरपालिका प्रशासनावरदागली तोफबीड (रिपोर्टर)- नगरपालिका प्रशासन शहरवासियांच्या समस्या जाणून घेण्यात उदासिनता दाखवत आहे. गेल्या चार दिवसांपासून रस्त्याच्या मागणीसांी आम आदमी...

अखेर सत्याचा विजय! धनंजय मुंडेंविरुद्ध ‘त्या’ महिलेने केलेली खोटी तक्रार घेतली मागे

मुंबई (रिपोर्टर): सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा खोटा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने अखेर...