चकलांबा पोलिसांची कारवाई

बीड, (रिपोर्टर)ः-वाळू घेवून जाणारा टिप्पर चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला आहे. वाळूसह टिप्पर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिसांनी अवैध रित्या वाळू घेवून जाणारा टिप्पर क्र.एम.एच.46.1446 हा घोगस पारगाव शिवरामध्ये ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी टिप्परसह वाळू असा एकूण 20 लाख 18 हजारांचा अवैज जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पो.नि.संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवन जंघाळे, पो.उ.नि. अजय पानपाटील, येडे, घोंगडे यांनी केली.