बीड (रिपोर्टर) पीकविमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. मराठवाड्यातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला असून जिचल्हाभरातील 16 लाख शेतकर्यांनी विविध पिकांचा विमा भरला. जवळपास 6 लाख हेक्टरसाठी शेतकर्यांनी विमा भरलेला आहे.
गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडू लागलाय. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होत असल्याने शेती पिकाचं मोठं नुकसान होत असतं. शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने विविध कंपन्यांच्या मार्फत विमा विमा भरून घेतला जातोय. यावर्षी विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. जिल्ह्यातील 16.48 लाख शेतकर्यांनी 6.27 लाख हेक्टरसाठी विमा भरला. जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झालेल आहे. या दोन्ही पिकांचा जास्त प्रमाणात विमा भरण्यात आलेला आहे.