बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभाग रात्रंदिवस करत आहे. काल घेतलेल्या स्वॅबचा अहवाल आज दुपारी साडेबारा वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून यामध्ये ५९९ जण निगेटिव्ह तर ३५ जण बाधीत आढळून आले आहेत.
आज आरोग्य विभागाला ६३४ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये अंबाजोगाई ४, आष्टी ८, बीड १७, धारूर १, माजलगाव १, परळी २ व वडवणी तालुक्यात २ बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ८० टक्के रुग्ण हे नवीन आहेत.