कुंडलिका नदी पात्रातून वाळू उपसा
नदीकाठी वाळूचे साठे दिसले
महसुलचे अधिकारी व कर्मचारी धिम्म
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातून वाहणाऱ्या एकमेव कुंडलिका नदीपात्रातून वाळू माफिया वाळू उपसा करत असून नदीतच मोठ-मोठ खड्डे पाडत असून या प्रकरणाकडे वडवणी महसुल प्रशासनाने देखील दुर्लक्ष केल्याच दिसून येत असल्याने या वाळू माफियांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
वडवणी तालुक्यातील एकमेव कुंडलिका नदी हि चिंचवण, उपळी, कुप्पा, परडी माटेगांव मार्ग माजलगांव धरणाला जावून मिळते. सध्या पावसाचे दिवस असले तरी म्हणावे तेवढे कुंडलिका नदी पात्रात वाहते पाणी नाही यांचाच फायदा घेत कुप्पा, उपळी शिवारात वाळू माफियांनी चक्क हौदास मांडल्याचे दिसून येत आहे.नदी पात्रात जेसीबी नेत थेट वाळू उपसा करत नदी पात्रात मोठमोठे खड्डे देखील पाडले आहेत.तर ट्रक्टर व जेसीबीच्या सहाय्याने भरुन वाळू माफिया वाळूची तस्करी करत असून वाळू माफिया हे कुणालाच जूमानत नसल्याचे बोलले जात आहे.तर या प्रकरणाकडे जाणूनबुजून वडवणीचे महसुल विभाग दुर्लक्ष करत असून यामध्ये महसुल आणि वाळू माफियांची सटलमेंट तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित राहत असून वाळू उपसा करत असलेल्या शेजारील शेतकऱ्यांना देखील यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.यामुळे या भागात वाळू माफियाची चलती होत आहे.तर याकडे महसुल प्रशासनाने देखील जाणूनबुजून कि मुद्दामहून कि अर्धपूर्ण दुर्लक्ष जात असल्याचा आरोप होत आहे तर या वाळू माफियावर कार्यवाही कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे.