Tuesday, January 26, 2021
No menu items!
Home क्राईम दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर)- अंबाजोगाई पोलिसांना 2019 पासून हव्या असलेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे.
सुनिल परमेश्वर शिंदे (वय 24, रा. जेबा पिंप्री) यायावर कलम 379 नुसार अंबाजोगाई पोलिसात गेल्या दोन वर्षांपुर्वी गुन्हा दाखल होता. त्याचा शोध पोलिस घेत होते. काल स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय आनंद कांगुणे यांना तो त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी त्याच्या घरी छापा मारला असता तो मिळून आला. त्याच्याकडे एक दुचाकीही मिळाली. त्या संदर्भात पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता ती दुचाकी त्याने धारूर शहरातून चोरली असल्याचे सांगीतले. ती दुचाकी हरवल्याची धारूर पोलिसात तक्रार दाखल होती. त्यामुळे अंबाजोगाई पोलिसांना हवा असलेला आरोपीही मिळाला अन् धारूर पोलिसांनाही दुचाकी चोराचा तपास लागला. सदरील कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय आनंद कांगुणे, पोलिस हवाल उबाळे, पोलिस हवालदारतांदळे, ठोंबरे, पवार यांनी केली.

Most Popular

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

अग्रलेख- महागाईत तेल

गणेश सावंत९४२२७४२८१०लोकांनी लोकांसाठी लोकाकरीता चालवलेल्या राज्यात सर्वसामान्य लोकांसाठी सरकार काही करतय की नाही? हा सवालच नाही तर उत्तर घेण्याची वेळ आज येवून...

दुसरी मुलगीच झाली,डॉक्टर पतीकडून पत्नीस मारहाण

बीड (रिपोर्टर)- मुलगा आणि मुलगी असा भेदभाव अजूनही संपलेला नाही. डॉक्टर असलेल्या पतीने पत्नीस रात्री बेदमपणे मारहाण केली. सदरील ही मारहाण दुसरीही...