बीड (रिपोर्टर) ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवणार्या सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने आज माजलगावमध्ये ऊसतोड कामगारांची राज्यस्तरीय परिषद संघटनेचे उपाध्यक्ष डि एल कराड, मोहन जाधव यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी सकाळी माजलगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारोंच्या संख्येने ऊसतोड कामगार सहभागी झाले होते.
ऊसतोडणी कल्याणकारी महामंडळाची प्रत्यक्ष अमलबजावणी करावी. कामगारांची नोंदणी करावी. कामगारांना प्रत्यक्ष लाभ द्यावा, महागाईच्या प्रमाणामध्ये ऊसतोडणीचे दर वाढवून मुकादमाचे कमीशन व पेट्रोल डिझेल दरवाढीच्या प्रमाणात वाहतूकचे दर वाढवावेत, ऊसतोडणी कामगारांसाठी घरकुल योजना सुरू करून ांधकामासाठी पाच लाख रूपये अनुदान द्यावे. ज्या ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत अशा महिलांना अपंग प्रमाणपत्र देवून त्यांना नुकसान भरपाई व पेन्शन द्यावे. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र व विमा योजना, आरोग्य सहाय्य योजना, मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना यासह विविध मागण्यांसाठी संघटनेचे राज्याध्यक्ष डि एल कराड, मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो ऊसतोड कामगार आज माजलगावमध्ये एकवटले आहेत. या ऊसतोड कामगार परिषदेचे उदघाटन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डिल एल कराड यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी मोहन जाधव यांच्यासह दत्ता डाके, एम एच शेख, सुभाष जाधव, आबासाहे चौघुले, नामदेव राठोड, बाबा सर, रोहिदास जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार उपस्थित होते. सुरूवातीला शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.