Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeराजकारणपंचवार्षिकला कारभारी बदलतात समस्या त्याच विकासाच्या नव्हे तर आपला परका, नातेगोते पाहून...

पंचवार्षिकला कारभारी बदलतात समस्या त्याच विकासाच्या नव्हे तर आपला परका, नातेगोते पाहून सरपंच निवडला जातोय

गणेश जाधव । बीड
9922773117

पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा सरपंचाला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतला 14 वा वित्त आयोग लागू झाल्याने आणि गावच्या विकासासाठी थेट निधी ग्रामपंयाचतला येत असल्याने सरपंचपदाला मोठं महत्व प्राप्त झाले आहे. एका पंचवार्षिकला सरपंच गावचा कायापालट करु शकतो. मात्र सध्या होत असलेल्या निवडणूका ह्या विकासाच्या मुद्यावर नव्हे तर आपला परका, नातेगोते पाहून ग्रामपंचायतचा उमेदवार निवडला जात आहे. त्यामुळे विकासाला मोठी खिळ बसते. आतापर्यंत भावकी, आपला परका हेच पाहून मतदारांनी मत केल्याने दर पंचवार्षिकला फक्त कारभारी बदलेले आहे. मात्र आजही समस्यात त्याच कायम आहेत.
सध्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने येत्या 15 तारखेला मतदान होत आहे. मोठ्या प्रमाणात सुशिक्षित उमेदवारही निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. ते विकासाच्या मुद्यावर प्रचार करत असले तरी गाव पातळीवरचे राजकारण हे विकासाच्या नव्हे तर भावकिच्या जोरावर लढवले जात आहे. उमेदवार कसलाही असो मात्र ज्याची गावात जास्त भावकी तोच उमेदवार निवडून येत असल्यामुळे विकासाला मोठी खिळ बसत आहे. या उमेदवारांना गावच्या प्रश्‍नांचे काहीही देणे घेणे नसते त्यांना केवळ आणि केवळ स्वत:ची प्रतिष्ठा राखायची असते. त्यामुळेच वर्षानुवर्ष गावचा विकास होण्यापेक्षा अधोगतीच होत आहे. आजही ग्रामीण भागात रस्ते, नाल्या, लाईट, शाळा या मुलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. याला ते उमेदवार जबाबदार नसून त्यांना निवडून देणारे मतदारच याला कारणीभूत आहेत. त्यामुळे मतदारांनी आता भावकी, आपला, परका हे पाहून नव्हे तर सुशिक्षित आणि गावचा विकास करणार्‍या उमेदवारालाच मत देण्याची गरज आहे.

रस्ते, नाल्या आणि पाणी याच समस्या वर्षानुवर्ष
जिल्हा परिषदेच्या सदस्याला थेट जेवढा निधी येत नाही त्यापेक्षा जास्त निधी ग्रामपंचायतला येतो. सुशिक्षित सरपंच असेल तर तो विकासाचे कामेही खेचून आणतो. अन् गावाचा कायापालट करतो. मात्र केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी भावकिने निवडून दिलेला उमेदवार हा रस्ते, नाल्या आणि पाण्याचाही प्रश्‍न सोडवीत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या कायम आहेत.

गावकीसाठी पुन्हा भावकी एकवटली
गावपुढारी हे भावकीच्या जिवावर स्वत:ची पोळी भाजून घेतात. आपल्या भावकीचाच सरपंच झाला पाहीजे म्हणत गावात प्रचार करतात. मात्र उमेदवार देतांना हे गावपुढारी सुशिक्षित नव्हे तर त्यांच्या एैकण्यातील आणि अशिक्षित उमेदवार पुढे करतात. भावकीतले लोकही आपली गवात प्रतिष्ठा वाढवावी सरपंच आपलाच असावा म्हणून प्रतिष्ठेपुढी विकास करणार्‍याला डावलून कोणाच्याही तातात गावकीचा कारभार देतात.


म्हणून गावचा विकास होत नाही
निवडणूक आली की मतदारांना चपटी अन् बोटी लागते. अशातच आरक्षणावर झालेले अनेक सरपंच हे नामधारी सरपंच असतात. निवडणूकीच्या काळात त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अशा वेळी पॅनलप्रमुखच मतदारांचा चपटी अन् बोटीचा खर्च करतो. त्यामुळे पाच वर्षे सरपंच हा केवळ नामधारी राहतो अन् पॅनलप्रमुख निवडणूकीच्या काळात केलेल्या खर्चाच्या 100 पट वसूल करतो म्हणूनच गावचा विकास होत नाही.

Most Popular

error: Content is protected !!