पोलीसांकडून पंचनामा, श्वान पथकाला केले पाचारण
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरात चोरट्यांचा सुळसुळाट आसताना आता अज्ञात चोरट्यांनी ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविला असल्याच दिसून येत असून मौजे साळिंबा येथील शेतकऱ्याचे भर दुपारी घर फोडले असून यामध्ये नगदी रुपायासह सोने असा एकुण 3 लाख 12 हजार रु.ऐवज लंपास केला आहे.या प्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी 12 वा.श्वासन पथकाला पाचारण करण्यात आले आहे.तर चोरट्यांनी पोलीसांना आव्हान तर दिले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
याबाबत आधिक माहिती अशी कि,वडवणी शहरातील एकाच रात्री चार ते पाच दुकान फोडलेले आहेत.चोरटा सीसीटिव्ही कँमेरात कैद असताना देखील यांचा तपास लागतो कि नाही तोच आता साळींब्यात चोरीची घटना काल दुपारी बारा वाजता घडली आहे.शेतकरी असणारे रमेश तुकाराम तोगे यांचे घर साळींबा शिवारात साळींबा-पिंपरखेड रस्त्यावर आहे.घरातील सर्वच मंडळी शेतात गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरात ठेवलेले 500 आणि 100 रु.नोटा असा एकुण 2 लाख 35 हजार रुपये,चार सोन्याच्या अंगठ्या त्यांची एकुण किंमत 50 हजार रु.किंमत,गळ्यातील सोन्याची बोरमाळ 4 ग्रँम तिची किंमत 12 हजार रुपये,अशा एकुण अज्ञात चोरट्यानी 3 लाख 12 हजार रुपायांचा ऐवज लंपास भरदुपारी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असून या घटनेन शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी रमेश तुकाराम तोगे यांच्या फिर्दीवरुन आज्ञात चोरट्या विरोधात गु.र.नं.184/2022 कलम 454,380 भादवी नुसार रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून वडवणी पोलीसांनी आज घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे.तर आज दुपारी 12 वा.बीड येथील श्वासन पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते अशी माहिती मिळाली असून शहरातील चोऱ्या नंतर चोरट्यांनी ग्रामीण भगाकडे मोर्चा वळविला आहे? यानिमित्त सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करत आहे.
फिंगर प्रिंट मिळाले,तपास करु – पवार
या प्रकरणी तपास आधिकारी पीएसआय पवार यांच्याशी रिपोर्टरने संपर्क साधाला असता म्हणाले कि,साळींबा याठिकाणी दोन चोऱ्या एकाच वेळी झाल्या आहेत.याप्रकरणी फिर्याद घेतली आहे.श्वासन पथकाला पाचारण करण्यात आले असून आताच त्यांचेकाम पूर्ण झाले आहे.फिंगर प्रिंट चांगले मिळून आले आहेत.काय होते ते तपास करुन काय होते ते लवकरच कळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.