बीड (रिपोर्टर) अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाईकडे परत जात असतांना ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने कार ट्रकखाली खुसली. झालेल्या भिषण अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पती जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी (दि. 30 ) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
अंबाजोगाई येथील होलसेल केमिस्ट विक्रेते पूजा डिस्ट्रिब्यूटर्सचे जितेंद्र झंवर हे पत्नी ज्योती, मुलगी ऋतुजा असे तिघे कार क्रमांक एम.एच. 44 एस 2990 ने औरंगाबाद येथून रात्री अंबाजोगाई कडे जात होते. दरम्यान बीडच्या बाहेर निघताच पालीच्या जवळी कोळवाडी येथे एका ट्रकला त्यांची कार पाठीमागून आदळल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात ज्योती जितेंद्र झंवर यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगी ऋतुजा जितेंद्र झंवर गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. जितेंद्र झंवर हे किरकोळ जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
अर्धवट कामामुळे अपघाताची मालिका सुरुच
मांजरसुंबा घाटाच्या खाली कोळवाडी येथे घाट संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूचे साईट पट्टे भरले नाहीत. विशेष म्हणजे या ठिकाणी सर्विस रोड ची अवश्यकता आहे. येथील नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून आयआरबीकडे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी केली होती मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. घाटात कोठेही लाईट नाही. येथील अर्धट काम पूर्ण करावे अन्यथा सर्व ग्रामस्थांना सोबत घेवून आयआरबी विरोधात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोळवाडीचे उपसरपंच तुळशिराम महाराज शिंदे यांनी दिला आहे.