गेवराई, (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरातील दिव्यांग,अंध,कर्णबधिर,विधवा महिला,मतीमंद,शेतकरी आदि पाञ असलेल्या निराधारांना शासनाने पगारी सुरु कराव्यात या मागणीसाठी परिसरातील पाञ असलेल्या निराधारांनी दत्ता वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान याबाबत तहसील प्रशासनाला यापूर्वीच निवेदन दिले होते,माञ दखल न घेतल्याने या पाञ निराधारांनी हे उपोषण सुरु केले आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात शेकडो पाञ निराधार व लाभार्थी आजही शासनाच्या पगारापासून वंचित आहे.शासनाच्या सर्व नियमानुसार आम्ही पाञ लाभार्थी असताना शासन अम्हाला पगारी सुरु करत नाही असा प्रश्न या पाञ लाभार्थी करत आहे.शासनाने अम्हा पाञ लाभार्थांना पगारी सुरु कराव्यात म्हणून गेवराई तहसील प्रशासनाला निवेदन दिले दिले होते.माञ याबाबत दखल न घेतल्याने पाञ असलेली व पगारीपासून वंचित असलेल्या जातेगाव परिसरातील अनेक निराधारांनी शुक्रवार पासून गेवराई तहसील कार्यालयासमोर तळ ठोकत दत्ता वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरु केले आहे.दरम्यान प्रशासनाने या निराधारांची दखल घ्यावी अशी मागणी तहसील परिसरातील नागरिकांमधून होत आहे.