नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा
हा उपक्रम अविरत सुरू राहील -ना. धनंजय मुंडे
मुंबई/बीड (रिपोर्टर)- राज्याचे सामाजिक न्यायमत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबार भरविण्यात आला. या वेळी ना. मुंडेंनी उपस्थितांचे निवेदन स्वीकारत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा हा उपक्रम अविरत चालू राहिल, असा विश्वास दिला.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईसह बीडमध्ये जनता दरबार भरविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई येथील जनता दरबारात मोठ्या संख्येने राज्यभरातील लोक आपल्या समस्या घेऊन मुंडेंकडे येत असतात. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये ना. मुंडेंचा जनता दरबार होता. या दरबारात राज्यभरातील अनेक लोक वेगवेगळ्या समस्या घेऊन आले होते. उपस्थितांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे निवेदन स्वीकारत मुंडेंनी लोकांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी संबंधितांना आदेश दिले. जनता दरबारामध्ये शासन-प्रशासन व्यवस्थेतील अनेक प्रश्न घेऊन अनेक जण आले होते. अधिकारी, कर्मचारी कोंडी करतात, ती कोंडी सोडवणं हे आमचं कर्तव्य असत, असं म्हणत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा हा उपक्रम अविरत सुरू राहील, असे आश्वासन ना. मुंडेंनी दिलं. ना मुंडेंच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून धनंजय मुंडे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोहवतात म्हणून राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक या जनता दरबाराला हजेरी लावून आपल्या तक्रारी ना. मुंडेंसमोर मांडतात.
‘लोकांची कोंडी सोडवणं आमचं काम’
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.