परळी (रिपोर्टर) बौद्ध विहारसमोरील गावठाण (सरकारी जागेसमोरील) अतिक्रमण हटवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, बौद्ध विहारासमोरील अनाधिकृत बांधकाम थांबविण्यात यावे, चुकीचे फेरफार रद्द करण्यात यावे, सरकारी कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कालपासून कर्हेवाडी येथील नागरिकांचे परळी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या वेळी अमर रोडे, विशाल रोडे, प्रशांत रोडे, महादेव रोडेंसह आदींची उपस्थिती आहे.