Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईमपरळीत दोन गटात लवारबाजी, ५ जण जखमी

परळीत दोन गटात लवारबाजी, ५ जण जखमी

१२ ते १३ जणांविरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल
परळी (रिपोर्टर):- जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये रात्री तलवारबाजी झाली. यामध्ये दोन्ही गटातील ५ लोक जखमी झाले. सदरील ही घटना शहरातील भोई गल्ली भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी १२ ते १३ जणांविरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला.
जुन्या भांडणाचा वाद उकरून रात्री दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील लोकांनी तलवारीने एकमेकांवर हल्ला चढवला. यात पाच जण जखमी झाले. जखमींना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक हनुमान बाळासाहेब मुंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख एजाज, मुज्जु खान, गफ्फार सय्यद, अझहर खान, शेख नदीम, शेख शहानवाज व इतर सात यांच्या विरोधात कलम ३०७ ५०६, ३२३, (४), २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!