Friday, May 20, 2022
No menu items!
Homeक्राईममाणुसकीला काळीमा, शेजार्‍याकडून २ चिमुकलींवर अत्याचार

माणुसकीला काळीमा, शेजार्‍याकडून २ चिमुकलींवर अत्याचार

परळी (रिपोर्टर)-तालुक्यातील सिरसाळा येथे दोन अल्पवयीन बालिकांवर लैंगिक अत्याचाराची खळबळजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हा प्रकार आठ ते दहा दिवसापुर्वीच घडला असल्याचे पीडितेच्या नातेवाईकाने सांगितले आहे. नातेवाईकाच्या फिर्यादीवरून २४ वर्षीय नराधमाविरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात ३७६ सह ३५४ (अ), ५०६ भा.दं.वि. सह कलम ४, ८, १२ बाललैंगिक अधिनियम प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटना घडून आठ ते दहा दिवस झाले, परंतू भीतीपोटी पीडित मुलींनी घरच्यांना सांगितले नव्हते. रविवारी या प्रकाराबाबत पीडित चिमुकल्या दोघी मुलींनी आईला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरसाळा पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या वडिलांनी आपल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, आपली एक मुलगी ७ वर्षाची आहे तर एक ८ वर्षाची आहे. दोघींना घराशेजारीच राहणार्‍या व्यक्तीने घरात नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे, अश्लील कृत्य केले. मुलींनी कुणालाही काही सांगू नये म्हणून त्यांना धमकावले. म्हणून हा प्रकार इतके दिवस उघड झाला नव्हता. अखेर पीडित मुलींनी घरी सांगिल्याने घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेपासून संबंधीत संशयीत आरोपी फरार आहे. सिरसाळा व परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे

Most Popular

error: Content is protected !!