बीड(रिपोर्टर) वाडी वस्ती तांड्यावरील शाळा पटसंख्येचे कारण दाखवून सरकार बंद करण्याचा घाट घालत आहे. यामुळे गोरगरीबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यांच्या हातातील दप्तर बाजुला ठेवून त्यांना गुरं ढोरं सांभाळावी लागणार आहेत. शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिक्षण मंत्र्यांना घेराव घालून तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देत जिल्हा परिषदेसमोर आज एसएफआय, डीवायएफआय संघटनेने विद्यार्थी पालकांना सोबत घेवून जोरदार निदर्शने केली व आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.
पटसंख्येचे कारण सांगून सरकारी शाळा ंद करण्याचा घाट हे सरकार घालत आहे. हा निर्णय म्हणजे तांडा, वाडी, वस्त्या येथील गोरगरी शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगारांच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव हे सरकार आणत आहे. याला एसएफआय, डीवायएफआय या विद्यार्थी संघटनेने जोरदार विरोध केला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कमी पटसंख्या हे कारण पुढे करून ग्रामीण आणि दुर्गम भागातील मराठी शाळा ंद करण्याचा घाट शासन घालत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण धोक्यात येत आहे. तर मुलींसाठी प्राथमिक शिक्षण कायमचे बंद होईल हा धोकादायक निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, एकीकडे शिक्षण कायदा सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची हमी देतो, शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे परंतू सरकार मात्र याच्या उलट दिशेने पाऊले उचलत आहे असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना मोहन जाधव म्हणाले, पटसंख्या कमी असणे हा प्रशासनाचा दोष आहे, तेथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा दोष नाही, त्यामुळे शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये टिकून ठेवण्यासाठी राज्यातील सरकारी मराठी शाळा बंद करू नयेत, त्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पाऊले उतलावीत. यावेळी डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष मोहन जाधव, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हासचिव विलास देशमुख, एसएफआयचे जिल्हाध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हासचिव लहू खारगे, सुहास जायभाये, प्रशांत मस्के, देविदास जाधव, कुंडलीक, विजय राठोड, मनोज देशमुख, प्रविण देशमुख, फारुक सय्यद, सिद्धराम सोळंके, बाळासाहे शेप, मल्हारी जाधव, बळवंत कदम, संगमेश्वर आंधळकर, राजेश शिंदे, सतीश सव्वासे, भगतसिंग राठोड, युवराज चव्हाण, राहूल चव्हाण, बाबा फुटाळ यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.