Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडकेजकेज नगरपंचायतच्या मतदार यादीत घोळ आक्षेपानंतर तरी बोगस मतदार निघणार की नाही?

केज नगरपंचायतच्या मतदार यादीत घोळ आक्षेपानंतर तरी बोगस मतदार निघणार की नाही?


केज (रिपोर्टर):- केज नगरपंचायतच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत. सध्या मतदार यादीची छाननी आणि आक्षेप याबाबत कामकाज सुरू आहे. शहरातील काही राजकीय पुढार्‍यांनी आपल्या स्वार्थासाठी ग्रामीण भागातील नावे मतदार यादीत समाविष्ट केले आहेत. या बाबत अनेक वेळा तक्रारी देखील करण्यात आल्या मात्र याची दखल नगर पंचायत प्रशासनाने घेतलेली नाही. २१ फेब्रुवारीपर्यंत मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविण्यात येणार आहेत. आक्षेपावर विचार करून बोगस मतदारांची नावे काढली जाणार की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
नगरपंचायत निवडणुकीचा कार्यकाळ संपुष्टात आला असला तरी कोरोनामुळे नगरपंचायतची निवडणूक झालेली नव्हती. सध्या नगरपंचायतवर प्रशासक नेमलेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये नगरपंचायतची निवडणूक घोषीत होणार असल्याने मतदार याद्यांबाबतच्या आक्षेपाचे काम सध्या सुरू आहे. शहरातील काही राजकीय पुढार्‍यांनी आपल्या स्वार्थासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची नावे शहरी भागामध्ये समाविष्ट केलेली आहेत. या बोगस नावांबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या मात्र याची दखल संबंधित निवडणूक विभागाने घेतलेली नाही. २१ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. या आक्षेपात तरी बोगस मतदार वगळले जाणार आहेत की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बोगस नावांमुळे राजकीय पुढार्‍यांना फायदा होत आलेला आहे. दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे त्याचा दुरुपयोग राजकीय पुढारी करत असल्याने याबाबतची दखल निवडणूक विभागाने घेऊन दोन ठिकाणी असलेली नावे वगळण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!