परळी (रिपोर्टर) मनसे नेते अमित ठाकरे हे मंगळवारी परळी शहरात आले असता परळीतील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे स्वागत केले.70 ते 80 संख्या असलेल्या या कार्यकर्त्यांध्ये चोरांनी घुसत मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्यासह इतर दोघांचे मोबाईल लंपास करत अनेकांचे खिसे कापले.विशेष म्हणजे दहा फुटांवर सीसीटिव्ही असताना पोलिसांना या चोरांचा अद्याप तपास लागलेला नाही.
मनसे नेते अमित ठाकरे हे मंगळवार दि.11ऑक्टोबर रोजी परळी शहरात आले होते वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी सात वाजता परळीतील मनसे पदाधिकार्यांनी राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी 70 ते 80 कार्यकर्ते उपस्थित असताना अज्ञात चोरटे कार्यकर्त्यांमध्ये घुसले यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा 45 हजार रुपयांचा माणिक लटिंगे यांचा 18 हजार रुपयांचा आणी इतर एकाचा असे तीन मोबाईल लंपास केले तर गंगाखेड येथील एका कार्यकर्त्याच्या खिशातील 50 हजार रुपये लंपास केले.मोबाईल चोरी प्रकरणी राजेंद्र मोटे व माणिक लटिंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सीसीटिव्हीसमोर चोरट्यांनी मारला डल्ला
शहरातील सर्वात गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित असुन या सीसीटिव्ही समोरच अमित ठाकरे यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता.70 ते 80 जणांच्या जमावातुन मोबाईल व पैसे लंपास करुन चोरट्यांनी केले.अवघ्या 10 फुटांवर सीसीटिव्ही असताना संभाजीनगर पोलिसांना चोरटे शोधता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.