किल्ले धारूर (रिपोर्टर ) दिंद्रुड येथील तिन तरुण सिरसाळा -मोहा रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअप वाहना सह बुडाले,दोघाजणांना वाचवण्यात यश आले असून एक जण सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता होता. रईस अन्सर आत्तार बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ही घटना काल शुक्रवारी (दि.14)सायंकाळी चार वाजे दरम्यान घडली.बेपत्ता झालेला तरुण गेल्या सोळा तासापासून बेपत्ता आहे त्याचा तपास लागत नाही आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे स्थानिक गावकर्यांच्या मदतीने किशोर मोहीम सुरू आहे परंतु तो वाहून गेलेला तरुण आणखीही सापडला नाही शोध मोहीम करण्यासाठी परळी येथील पथकाचे पाचरण करण्यात आले आहे ड्रोन द्वारे बेपत्ता तरुणाचा तपासासाठी शोध मोहीम सुरू आहे
घटनस्थळी तहसीलदार दत्त भारस्कर पथका सह काल हजर होते तर आज सकाळपासूनच धारूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी तळ ठोकून आहेत. गायब तरूणाचा शोध घेण्या साठी पथक हि बोलवले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले,ओढयांना पूर आला आहे.माजलगांव तालुक्यातील दिंद्रुड येथील शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार, व दिपक चोरघडे हे तीन तरुण चार चाकी पिकअप घेऊन दिंद्रुडहुन आंबेजोगाईला जाण्यासाठी निघाले होते.सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्यात पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहन व तिन तरुण शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे शेख अखिल आत्तार, व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले मात्र शेख रईस अन्सर अत्तार (वय 35 वर्ष) वाहत्या पाण्यात बेपत्ता झाला आहे. पडता पाऊस व पुराच्या पाण्याचा प्रवाहामुळे शोध कार्यास अडथळा येत आहे. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर मुंगी-सुकळी तलाव असून त्यामध्ये तरुण वाहत गेल्याचा संशय आहे
ओढ्यात नोटांचा खच
शेख अखिल अत्तार आणि शेख रईस अन्सर अत्तार हे नातेवाईक आहेत. ते दोघे व्यापारी असून फटाक्यांचा माल भरण्यासाठी दीपक चोरघडेचे पिकअप घेऊन अंबाजोगाईकडे निघाले होते. गाडीसह तिघेही बुडत काही अंतरावर वाहत गेले. या व्यापार्यांकडे फटाके खरेदीसाठीची मोठी रक्कम होती. ती ओढ्यात सर्वत्र पसरली होती. ओढ्याच्या जवळच असलेल्या मुंगी-सुकळी तलावात देखील नोटांचा खच पाहण्यास मिळाला.