बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात डेंंग्यूच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. शासनाकडे सध्या उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 9 असली तरी प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा आहे. गेल्या चार-पाच दिवसांत दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारी 2022 पासून आतापर्यंत बीड जिल्ह्यात 44 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा आकडा आरोग्य विभागाकडे आहे. 13 जणांना चिकनगुणिया झाला आहे. गेल्या आठ दिवसात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. दोन संशयितांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. किठिकाणी धूळफवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळून डेंग्यू घालावा, असे हिवताप अधिकारी विजय शिंठदे यांनी सांगितले.