विद्यार्थ्यांसह पालकात संताप
यादीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास दिली परवानगी
आष्टी (रिपोर्टर) बी.एस्सी.च्या परीक्षा सुरू आहेत. आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या फक्त एकाच विद्यार्थिनीचे हॉलतिकिट आले, इतर जवलपास 100 विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट न आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांसह पालकात संताप व्यक्त करण्यात आला. काही पालकांनी थेट विद्यापीठाला फोन लावून जाब विचारला होता.
सध्या बी.एस्सी.च्या परीक्षा सुरू आहेत. आष्टी येथील अनेक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. भगवान महाविद्यालयातील एकाच विद्यार्थीनीचे हॉल तिकिट आले. इतर विद्यार्थ्यांचे मात्र हॉल तिकिट आले नसल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांसह पालकांनी महाविद्यालय व विद्यापीठाकडे जाब विचारला. महाविद्यालयाच्या चुकीमुळे हॉल तिकिट आले नसल्याचे सांगण्यात येते. महाविद्यालयाने वेळेवर विद्यार्थ्यांची यादी पाठवली नसल्यामुळेच वेळेवर हॉल तिकिट आले नाहीत. आज दुपारी पेपर असल्यामुळे विद्यार्थी हॉल तिकिटची वाट बघत बसले होते. हॉल तिकिटअभावी परीक्षा द्यायची कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थेट महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकिट देण्याची मागणी केली मात्र परीक्षेच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल, असे उपप्राचार्य यांच्यावतीने सांगण्यात आले. आज सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांचे हॉल तिकिट मिळेल, असे त्यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.