नागपूरहुन येताच आ.संदीप क्षीरसागर जनतेच्या सेवेत
शहरातील विविध विकास कामाची प्रत्यक्ष सुरुवात आणि सुरू असलेल्या कामांची पाहणी…
बीड (रिपोर्टर) बीड आणि शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 60 पेक्षा अधिक ग्रामपंचायतवर निर्विवाद वर्चस्व स्थापन करून विजयाचा गुलाल लावून गेल्याले आ संदीप भैया क्षीरसागर आज नागपूरहून आधिवेशनाला दोन दिवस तहकुब असल्याकारणाने मतदारसंघात दाखल होऊन चालू असलेल्या विकास कामाची पाहणी आणि नवीन विकास कामाचा शुभारंभ आज केला असून बीड शहरातील धांडे गल्ली भागात मागील अनेक महिन्यांपासून कमी दाबामुळे विजेच्या समस्या निर्माण झाले होती,यामुळे परिसरातील व्यापारी,नागरिक, विद्यार्थी विजेअभावी त्रासित झाले होते.
ही समस्या पूर्ण करत जिल्हा नियोजन अंतर्गत नागरिकांच्या मागणीनुसार धांडे गल्ली येथे दोनशे केव्हीची नवीन डीपी आज प्रत्यक्ष बसून आ संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. याच बरोबर धांडे गल्ली भागात मोठा नाला असल्याकारणाने नाल्याचे पाणी कमी होत नव्हते यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.या संदर्भात अधिकार्याला सूचना करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले तसेच या भागात रस्त्यावरील अडथळा निर्माण करणारे पोल मुळे रहदारीचे खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबतीत वीज महामंडळाचे अधिकार्यांना तातडीने पोल शिफ्टिंग करण्याचे आदेश दिले.तसेच
मोमीनपुराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर नाली कामाला आज आ संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. मोंढा भागातील मुख्य रस्ता आणि नाले बांधकामाचे आणि अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे सुरू असलेले उत्कृष्ट दर्जाच्या कामाची स्थानिक व्यापारी. नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते समवेत पाहणी करून कामाच्या दर्जा तपासण्यात आला आणि कमी तिथे अधिकार्यांना जनतेच्या मागण्या समजुन घेऊन उत्कृष्ट दर्जाचे काम करावे अशा सूचना दिल्या यामुळे या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून बीड मतदार संघात आणि शहरात जास्तीत जास्त विकास योजना राबविण्यासाठी मी प्रयत्नशील येणार्या काळात विकास कामावरती बीड मतदार संघ महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहणार आहे याबाबत कोणाचे दुमत नसावे आणि हे सर्व आपल्या आशीर्वाद आणि विश्वासामुळे होत आहे. अशा भावना आ संदीप भैय्या क्षीरसागर यांनी या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केल्या आहेत.