Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम जुगार अड्‌ड्यावर एलसीबीचा छापा ९ जुगार्‍यांना घेतले ताब्यात

जुगार अड्‌ड्यावर एलसीबीचा छापा ९ जुगार्‍यांना घेतले ताब्यात


बीड (रिपोर्टर):- स्थानिक पोलीसांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांची माहिती बीट अमलदारापासून ठाणेप्रमुखांपर्यंत असते मात्र तरी देखील ते अशा अवैध धंद्यांवर कारवाई करत नाहीत. काल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानमोडी शिवारात अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एलसीबीला मिळताच पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकून ९ जुगार्‍यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. या अवैध धंद्याची त्या त्या ठाण्यातील बिट अमलदारासह ठाणेप्रमुखांना खडा ना खडा माहिती असते. मात्र ते त्यांच्याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पावले उचलले आहेत. काल ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानमोडी शिवारातील उत्तरेश्वर कानडे यांच्या शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत यांना मिळाल्यानंतर पीएसआय संतोष जोंधळे यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता ९ जुगारी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ५५ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...