बीड (रिपोर्टर) वीज वितरण कंपनीचे खासगीकरण करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी आजपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून ज्या ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत झाला त्या ठिकाणची लाईट सुरळीत झालेली नव्हती. कर्मचार्यांनी काम बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे. (पान 7 वर)
वीज वितरण कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध केला जाऊ लागलाय. संघटनेने तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपात अधिकार्यांसह कर्मचार्यांचा सहभाग आहे. ज्या ज्या ठिकाणी विजेचा प्रॉब्लेम आला तेथील वीज बंद झाली होती. आंदोलनाचा ग्राहकांसह शेतकर्यांना चांगलाच फटका बसू लागलाय. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने अनेक शेतकर्यांना आपल्या पिकांना संपामुळे पाणी देता येणार नाही. (सविस्तर वृत्त 7 वर)